Gopichand Padalkar | गोपीचंद पडळकर यांच्याविरोधात राष्ट्रवादीत संतापाची लाट, कुठे ‘जोडेमारो’ तर कुठे घणाघात

| Updated on: Sep 18, 2023 | 8:13 PM

गोपीचंद पडळकर यांनी अजित पवार आणि सुप्रिया सुळे यांच्यावर खोचक शब्दांमध्ये टीका केलीय. त्यांच्या या टीकेचे पडसाद आता राज्यात उमटू लागले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते आणि नेते पडळकरांच्या विरोधात आक्रमक झाले आहेत.

Gopichand Padalkar | गोपीचंद पडळकर यांच्याविरोधात राष्ट्रवादीत संतापाची लाट, कुठे जोडेमारो तर कुठे घणाघात
Follow us on

पुणे | 18 सप्टेंबर 2023 : भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी आज राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि खासदार सुप्रिया सुळे यांच्यावर अतिशय खोचक शब्दांमध्ये टीका केलीय. त्यांच्या या टीकेवरुन राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि कार्यकर्ते प्रचंड आक्रमक झाले आहेत. विशेष म्हणजे गोपीचंद पडळकरांनी केलेल्या वक्तव्याचे पडसाद पुण्याच्या मावळमध्ये उमटले आहेत. अजित पवार यांचे समर्थक थेट जुन्या पुणे-मुंबई महामार्गावर उतरले, सोमटने फाटा येथे त्यांनी पडळकरांच्या फोटोला जोडे मारो आंदोलन केलं.

“वेळोवेळी विनाकारण अजित पवरांवर टीका करणाऱ्या गोपीचंद पडळकरांना पुणे जिल्ह्यात फिरू देणार नाही. आता पडळकरांनी माफी मागितली तरी माफी दिली जाणार नाही. ते दिसतील तिथं त्यांना आम्ही चोप देऊ”, अशी आक्रमक भूमिका अजित पवारांच्या समर्थकांनी घेतली आहे. विशेष म्हणजे या निमित्ताने महायुतीत संघर्ष निर्माण होण्याची शक्यता आहे.

‘…नाहीतर पडळकर सारखी डुक्करं घाणच खाणार’, रुपाली पाटील यांचा घणाघात

राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या रुपाली ठोंबरे पाटील यांनी गोपीचंद पडळकरांना प्रत्यु्त्तर दिलं आहे. “गोपीचंद पडळकर यांनी सुप्रिया सुळे आणि यांच्याबद्दल केलेलं वक्तव्य चुकीचं आहे. गोपीचंद पडळकर हा बांडगुळ वृत्तीचा माणूस आहे. पडळक यांना प्रसिद्धी पाहिजे म्हणून ते सातत्याने अजित पवार, शरद पवारांवर बोलतात. राजकारणात महिलांबाबत बोलताना आदर ठेऊन बोलावं. बेताल वक्तव्य कराल तरं जशास तसे उत्तर मिळणार. बांडगुळ वृत्तीच्या गोपीचंद पडळकर यांचा जाहीर निषेध करते”, अशी भूमिका रुपाली पाटील यांनी मांडली.

“लोकांमधून निवडून येणारे आमदार अजित पवार आहेत. गोपीचंद पडळकर यांच्या वक्तव्याला कुत्रासुद्धा भीक घालत नाही. त्यांच्या पक्षाने अशा लोकांना तंबी दिली पाहिजे, नाहीतर गोपीचंद पडळकर सारखी डुक्करं घाणच खाणार”, अशी खोचक टीका रुपाली पाटील यांनी केली.

“गोपीचंद पडळकर यांनी धनगर समाजासाठी काहीही केलेलं नाही. सरकारला पाठिंबा दिल्यानंतर त्यांनी अशी वक्तव्यं करणं म्हणजे बालिशपणाचं, नसलेलं अस्तित्व दाखवण्याचा प्रयत्न आहे. गोपीचंद पडळकर जनतेतून निवडून आलेले नाही. त्यांची अशी वक्तव्य करण्याची लायकी नाही”, असं प्रत्युत्तर रुपाली पाटील यांनी दिलं.

‘विकृत मनोवृत्तीचा हा माणूस’, सुनील तटकरे यांचं प्रत्युत्तर

राष्ट्रवादी काँग्रेसचे अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरेंनी देखील गोपीचंद पडळकरांच्या टीकेला प्रत्युत्तर दिलं. “विकृत मनोवृत्तीचा हा माणूस आहे. भाजपने या विकृत माणसावर कारवाई करावी. प्रदेशाध्यक्ष म्हणून मी भाजपाच्या वरिष्ठ नेत्यांकडे मागणी करत आहे. भाजपानं यावर कारवाई करावी. आम्ही याचा कडक शब्दांत निषेध करतो”, असं प्रत्युत्तर सुनील तटकरे यांनी दिलं.

“आम्ही या विकृत माणसाला विचारुन सत्तेत सहभागी होण्याचा निर्णय घेतला नाही. शाहू, फुले, आंबेडकरांच्या विचारला कुठेही तडा जाऊ दिला जाणार नाही. ओबीसींच्या आरक्षणाला धक्का न लागता मराठा समाजाला आरक्षण दिलं पाहिजे”, असं सुनील तटकरे म्हणाले.

“यावर चर्चा होण अपेक्षित आहे. महाराष्ट्र राज्यात पुन्हा महायुतीचं सरकार येईल. अजित पवार मुख्यमंत्री व्हावेत ही कार्यकर्त्यांची इच्छा आहे. मात्र आम्ही वास्तववादी आहोत”, अशी प्रतिक्रिया सुनील तटकरे यांनी दिली.