1999 ला मित्रानं राजीनामा देऊन जॅकेट आणि टोप्या शिवायला सांगितल्या तो म्हणजे शरद पवार : श्रीनिवास पाटील

| Updated on: Mar 05, 2022 | 7:54 PM

34 वर्ष नोकरी केली आणि 1999 साली मित्रानं बोलावलं आणि राजीनामा देऊन ये सांगितंल. राजीनामा दिल्यावर सांगितलं दोन चार जॅकेट आणि दोन चोर टोप्या शिवून घे, असं सांगितलं तो मित्र म्हणजे शरद पवार होय.

1999 ला मित्रानं राजीनामा देऊन जॅकेट आणि टोप्या शिवायला सांगितल्या तो म्हणजे शरद पवार : श्रीनिवास पाटील
श्रीनिवास पाटील
Image Credit source: Tv9 Marathi
Follow us on

पुणे: महाराष्ट्र साहित्य कला प्रसारिणी सभा, पुणे (Pune) या संस्थेच्या रौप्यमहोत्सवी वर्षानिमित्त कृतज्ञता सोहळा संपन्न होत आहे. या सोहळ्यात खासदार श्रीनिवास पाटील (Shriniwas Patil) यांचा भव्य सत्कार राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) करण्यात आला. यावेळी श्रीनिवास पाटील यांनी राजकारणात का आले त्यामागील घटना सांगितला.पंचम जॉर्ज आला गेट ऑफ इंडियामध्ये आला त्यावेळी एक उपरण घेऊन एक व्यक्ती उभा होता, त्याच सातारकराचा सुपुत्र म्हणून मी उभा आहे. उस्मानाबादला एक सभा झाली आमची काय मंडळी म्हणाली या वयात शरदराव, या वयात आम्ही काय करतो याचं उदाहरण 2019 ला झालं. त्यावेळी काय झालं, कोण श्रीकृष्ण होता, कोणतं सुदर्शन चक्र होतं. त्यामुळं अर्जुनाच्या छातीत बाण लागणार म्हणल्यावर कृष्णानं घोडी बसवली आणि तो बाण वरुन गेला. त्याच बाणामुळं हे सरकार स्थापन झालं. त्यातील ही मंडळी आहेत.

श्रीनिवास पाटील नेमकं काय म्हणाले?

कटगुणच्या महात्त्मा फुलेंची पगडी, पदरात काय घ्यावं ते उपरण नायगावच्या सावित्रीबाई फुले यांच्या जिल्ह्यातील श्रीनिवास तुमच्या समोर उभा आहे. वडिलांचे संस्कार लहाणपणी झाले. भोळी भाबडी शेतकरी कुटुंबातील माझी आई, स्वर्गीय कर्मवीर अण्णांच्या धनिनी बागेत लाकूड फोडून ज्यांनी पोरांना अंघोळा ज्यांनी घातल्या ते माझे वडिल आहेत. माझा जन्म 11 फेब्रुवारी 1941 ला झाला. शरद पवार 12 डिसेंबर 1940, मधुकर भावे हे 9 ऑक्टोबर 1940 चे आहेत. सुशीलकुमार शिंदे 4 सप्टेंबर 1941 आहेत.

वक्तृत्व, नाट्य, नाट्यछटा, हस्ताक्षर, चित्र याचा नाद होता पण तो नाद जपायचा अभ्यास सोडायचा नाही, नंबर सोडायचा नाही. कसलीच मुभा नव्हती. काय झालचं तर सरळ मुंबई पुण्याची वाट धरायची आणि माथाडी व्हायचं हा बापाचा दम होता. सुदैवानं अभ्यास केला प्रांत झालो. 24 जूनला 1965 ला कोल्हापूरला निघालो. वडिलांच्या पाया पडलो तेव्हा वडिल म्हणाले तारुण्य, सत्ता आणि संपत्ती हे एकत्र आले आणि जरा जरी घसरोल तरी तर राजा सुद्धा वाया जातो. त्यामुळं माझ्या कानावर काही आलं तर गोळी घालून ठार मारेल, असं वडिल म्हणाले. त्यामुळं काही जरी समोर आलं तरी वडिलांच्या बंदुकीची नळी दिसते. त्यामुळं कायद्याच्या चौकटीत राहून दोन ओळीत मोकळ्या जागा दिसतात त्यात माणुसकी ठेऊन आलेल्या माणसाचा सन्मान करत गेलो.

गांधी टोपी हिच आमची हॅट

माझे गुरु यशवंतराव चव्हाण म्हणायचे, पुढाऱ्यांनी कधी तरी नाही म्हणायला शिकलं पाहिजे. अधिकाऱ्यांनी हो म्हणायला शिकलं पाहिजे. आमचे एक मित्र होते मोठे त्यांनी एक नोट छापून आणली होती. एका मंत्र्यानं ती नोट लिहली होती. एक हुशार सेक्रेटरी होता. त्यानं सांगितलं साहेब तुम्ही सहा महिन्यांपूर्वी नॉट अप्रूव्ह लिहिलं. त्यावर हुशार सेक्रेटरीनं पुढे ई लिहिला आणि नोट अॅप्रुव्हड असं लिहिलं.

यशवंतराव चव्हाण यांनी 26 जानेवारी 1932 ला टिळक हायस्कूलच्या मैदानावर झेंडा लावला आणि वंदे मातरम म्हटले. म्हणून 18 महिने शिक्षा झाली. त्यानंतर त्यांच्या आई विठाबाई यांना बोलावला आणि गुन्हा कबुल करण्यास सांगितलं. तर त्यांनी यशवंतराव चव्हाण यांनी गुन्हा केला नसल्याचं सांगितलं.यशवंतराव चव्हाण म्हणाले गांधी हिच आमची हॅट आहे.

1999 मित्रानं राजीनामा द्यायला सांगितला

1965 साली प्रांत झालो. माझ्या वडिलांनी माझ्या समोर माझी कधी स्तुती केली नाही. दहावीला पास झालो त्यावर त्यांनी दोन तीन किलो पेढे कोर्टात वाटल्याचं आईनं सांगितलं. कठोऱ शिस्तीचे वडिल होते. ज्यांनी ज्ञान दिल ते यशवंतराव चव्हाण होते. 34 वर्ष नोकरी केली आणि 1999 साली मित्रानं बोलावलं आणि राजीनामा देऊन ये सांगितंल. राजीनामा दिल्यावर सांगितलं दोन चार जॅकेट आणि दोन चोर टोप्या शिवून घे, असं सांगितलं तो मित्र म्हणजे शरद पवार होय. शरद पवार ठरवतील ते धोरण,बांधतील ते तोरण, 80 टक्के समाजकारण आणि 20 टक्के समाजकारण असं काम केलं. शारदेचा चंद्र शरदचंद्र आमच्याबरोबर चालत असतो. कुठं उडी मारावी, कशी उडी मारावी याचं ज्ञान त्यांनी आयुष्यभर दिलं. हा शेवटचा सत्कार आहे का म्हणाले. जसं, राज्यपाल केलं तसं संपलं म्हणजे जीवनगौरव, कसं तरी वर्ष दिड वर्ष काढलं. 28 सप्टेंबरला फोन आला. काय करतोय विचारलं. कागद गोळा कर आणि फॉर्म भर म्हणून सांगितलं. 27 फॉर्म होते. या बँकेत किती, त्या बँकेत किती, आमचं काहीचं नाही त्यामुळं फॉर्म भरायला सोपं गेलं, असं श्रीनिवास पाटील म्हणाले.

पाहा व्हिडीओ

सातारला आलो तर धोधो पाऊस होता. आम्ही ओलेचिंब भिजलो. त्यावेळी मला दोन शब्द बोलायला सांगितलं. मी त्यावेळी ढगाला लागली कळ, पाणी थेंब थेंब गळ आणि तुमची सारी मतं मला मिळं, असं म्हटलं. आमचा आणि जनतेचा दुवा फार मोठा आहे, असं श्रीनिवास पाटील म्हणाले. आम्हाला शरद पवारांनी समाजसेवेचा कानमंत्र दिला, असंही श्रीनिवास पाटील यांनी सांगितलं.

इतर बातम्या:

Jhund Video: नागराजचा ‘झूंड’ नेमका कसाय? अभिनेता जितेंद्र जोशी म्हणतो, बच्चनगिरी..!

राज्यपाल Koshyari घटनेप्रमाणे काम करतायत, त्यांना टार्गेट करणं चुकीचे : Devendra Fadnavis