पुणे : महाविकास आघाडीचं सरकार स्थापन झाल्यानंतर शरद पवार पहिल्यांदाच जुन्नर-आंबेगाव दौऱ्यावर गेले आहेत. आज पवारांच्या उपस्थितीत शेतकरी मेळावा पार पडला. या मेळाव्याला गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांचीही प्रमुख उपस्थिती होती. या कार्यक्रमाला लोकांनीही तुफान गर्दी केली होती. मात्र उपस्थितांच्या तुफान गर्दीवर पवार आणि वळसे पाटलांनी ओझरतं बोलताना एका वाक्यात विषय कट केला. उपस्थितांचे मोजक्या शब्दात कान टोचताना गर्दीवर दोन्ही नेत्यांनी अधिकचं बोलणं टाळलं.
एकीकडे शासन प्रशासन सर्वसामान्यांना गर्दी करु नका, निर्बंध पाळा असं आवाहन करत असताना राजकीय कार्यक्रमांना मात्र तुफान गर्दी होते. याचविषयीचा उल्लेख आपल्या भाषणात पवार आणि वळसे पाटील यांनी केला. मात्र तो ही एक-दोन वाक्यात……..! कोरोनाचं संकट आहे, त्यामुळे गर्दी टाळायला हवी, लोकांना समोरासमोर भेटणं टाळायला हवं, असं पवार म्हणाले. तर पुणे जिल्ह्यातल्या शिरूर,आंबेगाव, जुन्नरमध्ये अद्याप कोरोना बाबतीत जास्त काळजी घेतली पाहिजे, असं म्हणत समोर जमलेल्या गर्दीचा उल्लेख टाळत वळसे पाटलांनी उपस्थितांचे कान टोचण्याचे प्रयत्न केले.
विधानसभा निवडणुकीनंतर महाविकास आघाडी सरकार सत्तेत आलं. सरकार स्थापनेनंतर पहिल्यांदाच शरद पवार ह्या भागात आले आहेत. महाविकास आघाडी सरकार स्थापनेनंतर कोरोनाची परिस्थिती उद्भवली. त्यामुळे जाहीर कार्यक्रम घेता आले नाहीत. आता हळूहळू आपण त्यातून बाहेर येतोय… पण पुणे जिल्ह्यात अद्याप शिरूर,आंबेगाव,जुन्नर मध्ये कोरोना बाबतीत जास्त काळजी घेतली पाहिजे आहेत, असं म्हणत समोर जमलेल्या गर्दीचा उल्लेख टाळत वळसे पाटील यांनी उपस्थितांचे कान टोचले.
आज राज्यात अडचणीची परिस्थिती आहे. त्यात वादळ, कोरोना यांसारखी आपत्ती आली. मुख्यमंत्री,उपमुख्यमंत्री कारभार पुढे घेऊन जाण्याचा चांगला प्रयत्न करत आहेत, असंही वळसे पाटील म्हणाले.
कोरोनाचे संकट आहे. त्यामुळे लोकांना भेटणं टाळायला हवं, असे सल्ले आम्हाला वैद्यकीय तज्ज्ञांनी दिलेत. पण काळे यांचा संकल्प होता. म्हणून आम्ही आलो. व्यासपीठ आणि समोरची गर्दीत अंतर ठेवून आम्ही कार्यक्रम करणार असं त्यांनी म्हटलं होतं. म्हणून मी यायचं ठरवलं, असं म्हणत उपस्थित गर्दीवर पवारांनी अप्रत्यक्षपणे नाराजी बोलून दाखवली.
(NCP President Sharad Pawar And home Minister Anil Deshmukh Pune Junnar Shetkari melava Crowds break Corona Rules And regulation)
हे ही वाचा :
‘पवार आमचे मार्गदर्शक, पण खेडमध्ये वळवळणाऱ्या किड्यांचा बंदोबस्त करु’, संजय राऊतांचा घणाघात