अभिजित पोते, बारामती, पुणे | 6 नोव्हेंबर 2023 : राज्यातील ग्रामपंचायतीसाठी आज सकाळपासून मतमोजणीस सुरुवात झाली. अजित पवार यांचे गाव असलेल्या काटेवाडी या गावाकडे राज्याचे लक्ष लागले आहे. कारण या ठिकाणी महायुतीमधील अजित पवार यांच्या पक्षाला महायुतीमधील भारतीय जनता पक्षाने आव्हान दिले होते. यामुळे या ठिकाणी निकाल कोणाच्या बाजूने लागतो? याची उत्सुकता सर्व राज्याला होती. अजित पवार यांचे वर्षानुवर्षांपासून असलेले वर्चस्व भाजप मोडून काढणार का? याचे उत्तर सोमवारी मिळाले. या ठिकाणी अजित पवार गटाचा विजय झाला. भाजपला पराभवास समोरे जावे लागले. अजित पवार यांच्या पॅनलकडून असलेल्या 24 वर्षीय गौरी गायकवाड विजयी झाल्या.
बारामती तालुक्यात अजित पवार यांचे वर्चस्व राहिले. तालुक्यातील एकूण 32 ग्राम पंचायतपैकी 30 ठिकाणी अजित पवार गटाने विजय मिळवला. दोन जागा भाजपला मिळाल्या. त्यात सर्वात महत्वाची आणि प्रतिष्ठेतेची लढत असलेल्या अजित पवार यांच्या काटेवाडी गावात राष्ट्रवादी विजय झाला. अन्यथा गड आला पण सिंह गेला, अशी परिस्थिती झाली असते. या ठिकाणी भाजपला आव्हान देताच आले नाही. सरपंच आणि सदस्य सर्वच राष्ट्रवादीचे झाले. काटेवाडीत राष्ट्रवादी काँग्रेसला 14 तर भाजपला केवळ 1 जागा मिळाली. एका ठिकाणी अपक्ष उमेदवाराने बाजी मारली.
या निवडणुकीत शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला एकही जागा मिळवता आली नाही. तालुक्यातील ३० जागा अजित पवार गटाने मिळवल्या. यामुळे बारामतीचे दादा अजित पवारच ठरले.
1)भोंडवेवाडी
2)म्हसोबा नगर
3)पवई माळ
4)आंबी बुद्रुक
5)पानसरे वाडी
6)गाडीखेल
7)जराडवाडी
8)करंजे
9)कुतवळवाडी
10)दंडवाडी
11)मगरवाडी
12)निंबोडी
13)साबळेवाडी
14)उंडवडी कप
15)काळखैरेवाडी
16)चौधरवाडी
17)वंजारवाडी
18)करंजे पूल
19)धुमाळवाडी
20)कऱ्हावागज
21)सायबाचीवाडी
22)कोराळे खुर्द
23) शिर्सुफळ
24) मेडद
25)मुढाळे
26) सुपा
27)गुणवडी
28) डोर्लेवाडी
29) मनप्पावस्ती
30) काटेवाडी