पुणे – पुण्याच्या दौऱ्यावर असलेल्या गृहमंत्री अमित शाह यांनी तळेगांव दाभाडे जवळील सदुंबरे येथील NDRF च्या कॅम्पला भेट दिली. यावेळी अडचणीत सापडलेल्या लोकांचे प्राण वाचवण्याची तुमची तत्परता व समर्पण यामुळे एनडीआरएफ कोणत्याही आपत्तीत एनडीआरएफ येताच सर्वसामान्य लोकांमध्ये आत्मविश्वास निर्माण होतो. देशसेवेसाठी तुम्ही देत असलेल्या अतुलनीय निष्ठेचा संपूर्ण देशाला अभिमान आहे. आपल्या कर्तव्य दक्षतेमुळं NDRF ने केवळ देशातच नव्हे तर परदेशातही जो विश्वास कमावला आहे. त्याचा प्रत्येक भारतीयाला अभिमान आहे. तुम्ही केवळ भारताच नव्हे तर नेपाळ, जपान यासारख्या देशातही तुम्ही आपल्या कामाची छापा सोडून आलात, तुमचे काम हे संबंध मानवजातीच्या प्रती असलेले संवेदन व समर्पण कौतुकास्पद आहे.
NDRF और दक्ष हो, बेहतर संसाधनों से सुसज्जित हो इसके लिए मोदी सरकार कटिबद्ध है।
अब SDRF को NDRF के समकक्ष बनाने का समय आ गया है।
इतने बड़े देश में आपदा के समय जनता को बचाने हेतु NDRF व SDRF के एक साथ काम करने की साझा ट्रेनिंग व प्रैक्टिस पर हमें बल देना चाहिए। pic.twitter.com/q5Na5bWlOs
— Amit Shah (@AmitShah) December 19, 2021
एनडीआरएफला अधिक कार्यक्षम करणारा
येत्या काळात केंद्र सरकार एनडीआरएफला अधिक कार्यक्षम, उत्तम संसाधनांनी सुसज्ज करण्यासाठी वचनबद्ध आहे. आता वेळ आली आहे एसडीआरएफला एनडीआरएफच्या बरोबरीने बनवण्याची. एवढ्या मोठ्या देशात आपत्तीच्या वेळी जनतेला वाचवण्यासाठी NDRF आणि SDRF यांच्या एकत्रित प्रशिक्षणावर आणि सरावावर आपण भर दिला पाहिजे.असेही शहा म्हणाले.
NDRF ने अपनी कर्तव्यपरायणता से न सिर्फ देश बल्कि विदेशों में भी जो विश्वास अर्जित किया है उससे हर भारतीय गौरवान्वित है।
दूसरे देशों में जाकर लोगों की जान बचाना समस्त मानवजाति के कल्याण हेतु @NDRFHQ के समर्पण व संवेदना का दर्शाता है।
हमें इस परम्परा को जारी रखना है। pic.twitter.com/u9J52bOzve
— Amit Shah (@AmitShah) December 19, 2021
प्रत्येक राज्यात फॉरेन्सिक सायन्सचे कॉलेज उभे रहावे
सर्व राज्य सरकारांनी फॉरेन्सिक सायन्सचे एक महाविद्यालय करावे आणि ते फॉरेन्सिक सायन्स कॉलेज विद्यापीठाशी संलग्न करण्यात यावे जोडावे.आतापर्यंत चार राज्यात या कॉलेज उभारण्याचे काम सुरु करण्यात आले आहे. इतर अनेक राज्यांच कॉलेज उभारण्याबाबतचे प्रस्तावही आलेले आहेत. नॅशनल फॉरेन्सिक सायन्स युनिव्हर्सिटी ही यावर गांभीर्याने विचार आहे. ज्या दिवशी ही फॉरेन्सिक सायन्सची महाविद्यालये सर्व राज्यांमध्ये सुरू होतील, तेव्हा देशात या क्षेत्रात कुशल जागतिक मानव संसाधनाची कमतरता भासणार नाही.असे मत शाह यांनी व्यक्त केले.
हमारा लक्ष्य है कि सभी राज्य सरकारें अपने यहाँ एक-एक फॉरेंसिक साइंस का कॉलेज बनायें और उसे राष्ट्रीय फॉरेंसिक युनिवर्सिटी से जोड़ें।
और जिस दिन सभी राज्यों में फॉरेंसिक साइंस के ये कॉलेज बन जाएंगे तब देश में इस क्षेत्र के कौशल युक्त वैश्विक मानव संसाधन बल की कमी नहीं रहेगी। pic.twitter.com/rmCc0dhFyn
— Amit Shah (@AmitShah) December 19, 2021
सिंगल चार्जमध्ये 120KM रेंज, EeVe Soul हाय-स्पीड इलेक्ट्रिक स्कूटर भारतात लाँच, किंमत…
Mumbai : स्नो फॉल नाही, तर पावडरची गळती! एचपीसीएलच्या प्लान्टमधला प्रकार
Car Accident | अक्सा बीचजवळ कारचा भीषण अपघात, एकाचा मृत्यू, 6 जण जखमी