पुणे : विधान परिषदेच्या उपसभापती निलम गोऱ्हे यांनी आज (29 जून) पुण्यातील एसआरएच्या कार्यालयात जाऊन मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र निंबाळकर यांची भेट घेतली. तसेच आंबील ओढ्यातील अतिक्रमण कारवाईची चौकशी केली. यावेळी त्यांच्यासोबत आंबील ओढा परिसरातील काही नागरिक देखील उपस्थित होते. त्यानंतर निलम गोऱ्हे यांनी पत्रकारांशी बोलताना याबाबत माहिती दिली (Neelam Gorhe visit SRA office regarding action against Ambil Odha in Pune).
निलम गोऱ्हे म्हणाल्या, “आंबील ओढ्यात जी काही अतिक्रमणविरोधी कारवाई झाली त्याची चौकशी राज्य सरकार करत आहे. आतापर्यंत अशा पद्धतीने कुठल्याच झोपडपट्टीवर कारवाई करण्यात आली नाही. परंतु ज्या पद्धतीने ही कारवाई करण्यात आली त्याबद्दल खेद आहे. पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांनी झोपडपट्टीत राहणाऱ्या नागरिकांच्या पाठीशी उभे राहणे गरजेचे आहे. या कारवाईच्या पाठीमागे कोण आहे याचे उत्तर काळ लवकरच देईल.”
निलम गोरे यादेखील बुधवारी आंबील ओढा परिसरात नुकसानग्रस्त लोकांची भेट घेऊन त्यांच्याशी चर्चा करणार आहेत.
#मविआ ऊर्जामंत्री @INCMaharashtra चे नेते @NitinRaut_INC यांनी आज पुण्यात आंबील ओढा झोपडपट्टी विषयावर भेट दिली.
यानंतर त्यांनी माझ्या निवासस्थानी सदिच्छा भेट दिली.सोबत रमेश बागवे,मोहन जोशी व अभय छाजेड होते.मी त्यांना पुस्तके भेट दिली. @MahaDGIPR @MohanJoshiINC @ShivSena @ANI pic.twitter.com/tQq4jRdcRV— Dr Neelam Gorhe (@neelamgorhe) June 29, 2021
दरम्यान, मविआ सरकारमधील ऊर्जामंत्री आणि काँग्रेस नेते नितीन राऊत यांनी आज पुण्यात आंबील ओढा झोपडपट्टी विषयावर निलम गोऱ्हे यांची भेट घेतली. यानंतर त्यांनी निलम गोऱ्हे यांच्या निवासस्थानीही सदिच्छा भेट दिली. त्यांच्यासोबत रमेश बागवे, मोहन जोशी व अभय छाजेडही होते. निलम गोऱ्हे यांनी नितीन राऊत यांना यावेळी पुस्तके भेट दिले.