गणेश थोरात, ठाणे, अभिजित पोते, पुणे दि.25 डिसेंबर | जगभरात दोन वर्ष धुमाकूळ माजवणाऱ्या कोरोनाची लस आल्यानंतर दिलासा मिळाला होता. आता कोरोना हद्दपार होईल, अशी अपेक्षा असताना नवीन व्हेरियंट भारतात दाखल झाला. देशात कोरोनाच्या नवीन व्हेरियंटचा पहिला रुग्ण केरळमध्ये आढळून आला. त्यानंतर महाराष्ट्रात हा व्हेरियंट कोकणात दाखल झाला. आता कोकणानंतर ठाणे आणि पुणे शहरात कोरोनाचा नवीन व्हेरियंटचे रुग्ण मिळाले आहे. ओमिक्रॉनच्या नव्या सब-व्हेरियंट JN.1 प्रकारामुळे चीन, सिंगापूर, भारतासह अनेक देशांमध्ये संसर्गाची प्रकरणे वाढत असल्यामुळे चिंता निर्माण झाली आहे. नवीन व्हेरियंट JN.1 चा संसर्ग झालेल्या व्यक्तीला चव आणि वास कळत नाही. ठाणे शहरात पाच तर पुणे शहरात तीन रुग्ण या व्हेरियंटचे मिळाले आहे. यामुळे राज्यातील नव्या व्हेरियंटची संख्या दहा झाली आहे.
कोरोनाचे ठाणे शहरात रुग्ण मिळाले आहे. ठाण्यात पुन्हा कोरोनाचा शिरकाव झाला आहे. नवीन व्हेरियंट jn 1 च्या पाच रुग्ण मिळाले आहे. Jn 1 च्या पाच रुग्णात 1 महिला 4 पुरुष आहेत. नवीन रुग्णांना गृह विलगीकरणात ठेवण्यात आले आहे. सर्वांची प्रकृती स्थिर आहे. या सर्वांना ताप आसल्याने त्यांची कोरोना टेस्ट करण्यात आली. त्यानंतर त्यांचे नमुने पुण्याच्या लॅबमध्ये पाठवण्यात आले. त्यानंतर नवीन व्हेरीएन्टचे हे रुग्ण पॉझिटीव्ह असल्याचे उघड झाले आहे. ठाण्यात सध्या 28 कोरोनाची लक्षणे असलेली रुग्ण आहेत.
कोरोनाचा नवीन व्हेरियंट असलेल्या जेएन १ चे पुणे शहरात दोन तर पुणे ग्रामीणमध्ये एक रुग्ण आढळला आहे. यामुळे राज्यातील रुग्णसंख्या दहा झाली आहे. या सर्व रुग्णांना नवीन व्हेरियंटची सौम्य लक्षणे होती. त्यांना घरीच विलिगीकरणात ठेवण्यात आले. आता ते बरे देखील झाले आहेत. पुणे शहरातील रुग्ण अमेरिकेतून आला होता. ४१ वर्षीय पुरुषाला कोरनाच्या नवीन व्हेरियंटची लागन झाल्याचे स्पष्ट झाले. राज्यात कोरोनाचे मिळालेल्या दहा पैकी आठ जणांनी लस घेतली आहे. सर्वांचे वय ४० पेक्षा जास्त आहे.