Pune Bitcoin scam | पुणे बिटकॉईन घोटाळ्यात नवीन ट्विस्ट ; आरोपी निघाला हॉंगकॉंगचा करदाता

| Updated on: Apr 02, 2022 | 12:30 PM

पाेलिसांच्या म्हणण्यानुसार रवींद्र पाटील याच्याकडून ट्रेझर वाॅलेट मिळाले आहे. मात्र त्याचे युजर नेम व पासवर्ड पाेलिसांना दिला नाही. या सगळयामध्ये त्याला जामीन मिळाला तर तो वाॅलेट उघडून संबंधित क्रिप्टाेकरन्सी लंपास करू शकताे.असा पोलिसांना संशय आहे. याबरोबरच त्याच्या त्याच्याविराेधात सुरू असलेल्या तपासातील डिजिटल पुराव्यांशी ताे छेडछाड करू शकताे.

Pune Bitcoin scam | पुणे बिटकॉईन घोटाळ्यात नवीन ट्विस्ट ; आरोपी निघाला हॉंगकॉंगचा करदाता
पुणे बिटकॉइन घोटाळा
Image Credit source: TV9
Follow us on

पुणे- पुणे बिटकाॅइन घोटाळ्याची (Bitcoin scam) व्याप्ती दिवसेंदिवस वाढत आहे. या घोटाळ्यातील मुख्य आरोपीवर अटकेची कारवाई केली. त्यानंतर पोलिसांनी(Police ) घोटाळ्याच्या तपासासाठी नेमलेल्या सायबर तज्ज्ञ म्हणून पंकज प्रकाश घोडे (रा. ताडीवाला रोड) आणि रवींद्र प्रभाकर पाटील (रा. बिबवेवाडी) यांची नेमणूक केली होती.मात्र तपास करत असताना माजी आयपीएस अधिकारी रवींद्र पाटील यानेच तब्बल 75 कोटी रुपयांचे 240 आरोपीकडील बिटकॉईन हडप केले. त्यातूनच त्याने आलिशान फ्लॅट व महागड्या गाड्याची खरेदी केल्याचेही पोलिस तपसात समोर आले. या गुन्ह्याप्रकरणी अटकेत असलेले आराेपी सायबरतज्ज्ञ(Cyber ​​expert) पंकज घाेडे आणि माजी आयपीएस अधिकारी रवींद्र पाटील यांना न्यायालयीन काेठडी मिळाली आहे.त्या दोघांनीही जामिनासाठी पुणे न्यायालयात अर्ज दाखल केला आहे.मात्र दाेघांच्या जामीन अर्जास विराेध करणारे लेखी स्वरूपातील म्हणणे पाेलिसांनी न्यायालयात सादर केले आहे.

रवींद्र पाटील हा हाँगकाँगमधील निवासी करदाता

अटकेत असलेला माजी आयपीएस अधिकारी रवींद्र पाटील हा हाँगकाँगमधील निवासी करदाता असल्याची माहिती समोर आली आहे. पाटील हा नियमितपणे हॉंगकॉंगला येजा करत असल्याची माहिती तपासात उघड झाली आहे. केपीएमजीया पोलिसांना मदत पुरवणाऱ्या कंपनीत पूर्वी संचालक म्हणून कार्यरत असलेल्या रवींद्र पाटील पुढे याच कंपनीत भागीदार झाल्याचेही पोलिसांना तपासात आढळून आले आहे.

जमीन मिळाल्यास

पाेलिसांच्या म्हणण्यानुसार रवींद्र पाटील याच्याकडून ट्रेझर वाॅलेट मिळाले आहे. मात्र त्याचे युजर नेम व पासवर्ड पाेलिसांना दिला नाही. या सगळयामध्ये त्याला जामीन मिळाला तर तो वाॅलेट उघडून संबंधित क्रिप्टाेकरन्सी लंपास करू शकताे.असा पोलिसांना संशय आहे. याबरोबरच त्याच्या त्याच्याविराेधात सुरू असलेल्या तपासातील डिजिटल पुराव्यांशी ताे छेडछाड करू शकताे. याबरोबरच या घोटाळ्यातील आराेपी पंकज घाेडे याने परदेशात माेठ्या प्रमाणात आर्थिक व्यवहार केलेअसल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.

Weekly Horoscope 10 April to 16 April 2022 | कसा असेल तुमचा नवीन वर्षाचा येणारा आठवडा, जाणून घ्या 10 ते 16 एप्रिलपर्यंतचं मेष ते कन्या राशींचे संपूर्ण राशीभविष्य

Box office collection : ‘RRR’ चित्रपटाचा बॉक्सवर धमाका सुरूच…, जॉनच्या अटॅकची इतके कोटींची कमाई!

Prabhakar Sail | 23 लाख कांतीला, 26 लाख किरण गोसावीला; प्रभाकर साईलचे खळबळ उडवणारे आरोप कोणते होते