पुणे : कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता राज्यातील 11 जिल्ह्यांमध्ये अजूनही लेव्हल 3 चे निर्बंध आहेत. यामध्ये पुणे जिल्ह्याचाही समावेश आहे. पुणे जिल्ह्यातील पर्यटनस्थळं विशेषत: लोणावळ्यात पर्यटकांवर बंदी आहे. मावळ तालुक्यातील धबधबे तसेच लोणावळा, खंडाळा या पर्यटनस्थळांकडे जाणारे रस्ते पुणे ग्रामीण पोलिसांकडून बंद करण्यात आले आहेत. त्यामुळे भुशी धरण, लायन्स पॉईंट, टायगर पॉईंट या प्रसिद्ध पर्यटन स्थळांवर शुकशुकाट पाहायला मिळत आहे. मात्र या पर्यटनबंदीच्या निर्णयाने हातावर पोट असलेल्या छोट्या व्यावसायिकांचे पुरते हाल झाले आहेत.
दरम्यान, लोणावळा-खंडाळा पर्यटन स्थळ निर्मनुष्य आहेत. पुणे जिल्हाधिकाऱ्यांनी कलम 144 नुसार जमावबंदीचा आदेश लागू केला आहे. त्यामुळे गर्दी होणारा लोणावळा परिसर सध्या निर्मनुष्य आहे.
पुणे जिल्हा लेव्हल 3 मध्ये असल्यामुळे या जिल्ह्यातील निर्बंध कायम आहेत. पुणे जिल्ह्यातील निर्बंध शिथील करण्याबाबत निर्णय झालेला नाही. तथापि पुण्यासाठी काही सूट देता येईल का याबाबत चर्चा सुरु आहे. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री त्याबाबत चर्चा करुन पुढील एक दोन दिवसात निर्णय घेतील”, अशी माहिती गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी दिली. ते पुण्यात पत्रकारांशी बोलत होते.
संबंधित बातम्या
Pune Lockdown | कलम 144 लागू असतानाही लोणावळ्यात पर्यटकांची गर्दी
पुण्यातील निर्बंधात सूट देण्याची चर्चा, एक-दोन दिवसात निर्णय होईल, गृहमंत्र्यांची माहिती
पुण्यासह पश्चिम महाराष्ट्रात निर्बंधात सूट नाहीच, उलट वाढवले जाणार, काय सुरु, काय बंद?