पुणे : राज्यात रोजगार देण्यात पुणे, मुंबई हे शहर आघाडीवर आहेत. या शहरांमध्ये राष्ट्रीय नाही तर अनेक आंतरराष्ट्रीय कंपन्या आल्या आहेत. त्यांच्याकडून मोठ्या प्रमाणावर रोजगार निर्मिती झाली आहे. उच्च शिक्षण घेतलेल्या तरुणांचा ओढाही पुणे, मुंबई शहरांमध्ये नोकरी मिळवण्यासाठी आहे. परंतु देशात सर्वाधिक पगार देणाऱ्यांमध्ये पुणे, मुंबई शहर नाही. त्यापेक्षा राज्यातील दुसऱ्या एका शहरात जास्त वार्षिक पॅकेज दिले जात आहे. एका सर्वेमधून ही बाब उघड झाली आहे. यामुळे सर्वांचा आश्चर्य वाटत आहे.
पुणे, मुंबई, दिल्ली या शहरांना मागे टाकत राज्यातील सोलापूर शहराने नोकरीतील पॅकेजसंदर्भात आघाडी घेतली आहे. सोलापूरमध्ये वार्षिक सर्वाधिक पॅकेज दिले जात आहे. सोलापूरनंतर देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईत 21 लाख 17 हजार 870 रुपयांचे सरासरी पॅकेज आहे. त्यापेक्षा कितीतरी जास्त पॅकेज सोलापूरमध्ये मिळत आहे. देशातील सर्वाधिक पॅकेज देणाऱ्या शहरांच्या यादीत पुणे सातव्या क्रमांकावर आहे. पुणे शहरात सरासरी पॅकेज 18 लाख 95 हजार 370 रुपये आहे. पुणे शहरात सर्वाधिक माहिती अन् तंत्रज्ञान क्षेत्रातील कंपन्या आहेत. परंतु त्यापेक्षा जास्त पॅकेज दुसऱ्या शहरात अन् दुसऱ्या क्षेत्रात मिळत आहे.
सेक्टरनुसार विचार केल्यास मॅनेजमेंट क्षेत्रात सर्वाधिक पगार दिला जात आहे. या क्षेत्रात 29 लाख 50 हजाराचे सरासरी वार्षिक पॅकेज आहे. त्यानंतर विधी क्षेत्राचा क्रमांक आहे. या क्षेत्रात 27 लाख सरासरी पॅकेज आहे. देशातील पॅकेजची सरासरी 5 लाख 76 हजार 851 रुपये आहे.
लिंगनुसार पगारात पुरुषच आघाडीवर आहे. पुरुषांचा वार्षिक पगार 19 लाख 53 हजार 55 तर महिलांचा वार्षिक पगार 15 लाख 16 हजार 296 रुपये आहे. पदवीनुसार डॉक्टरेट डिग्री घेणाऱ्यांना सर्वाधिक पगार आहे. त्यानंतर क्रमांक मास्टर डिग्रीचा आहे.