सध्या एआचा जमाना आहे. त्यात चॅट जीपीटी अल्पवधीत जगभर लोकप्रिय झाले अॅप्लिकेशन आहे. एका सेंकदात तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरे चॅट जीपीटीमधून मिळतात. तुम्ही दिलेल्या मजकुराची मुद्देसूद मांडणी करुन चॅट जीपीटी सर्वांनाच चॅट पाडतो. या अॅप्लिकेशनच्या ‘जीपीटी ४ ओ’ याची निर्मिती नुकतीच अमेरिकेत झाली. परंतु या अॅप्लिकेशनच्या निर्मात्याची टीम लीड करणारा भारतीय होता. त्यातल्या त्यात तो पुणे येथील होता. प्रफुल्ल धारीवाल असे त्याचे नाव आहे.
चॅट जीपीटी अॅप्लिकेशन बनवणाऱ्या ओपन एआय कंपनीचे सीईओ सॅम अल्टमन यांनी प्रसार माध्यमांसमोर पुणेरी युवक प्रफुल्ल धारीवाल याचे कौतूक केले. त्याने या टीमचे नेतृत्व केल्याचे सांगितले. पुण्यातील कोथरुडमध्ये राहणाऱ्या सर्वसामान्य कुटुंबातील प्रफुल्ल धारीवाल याने अमेरिकेत जाऊन भारताचा नावलौकीक वाढवला.
पुण्यातील कोथरुडमधील प्रफुल्ल धारीवाल हा २९ वर्षीय युवक लहानपणापासून अतिशय हुशार आहे. बारावीच्या परीक्षेत त्याने भौतीकशास्त्र, रसायनशास्त्र आणि गणितात ३०० पैकी २९५ गुण मिळाले होते. त्यानंतर महाराष्ट्र सीईटी परीक्षेत त्याने ३६० पैकी ३३० गुण मिळवले होते. प्रफुल्ल याने बुद्धिमत्तेच्या जोरावर त्याने भौतिकशास्त्रातील ऑलिम्पियाडमध्ये देशात प्रथम क्रमांक मिळवला होतो. त्याने मॅसॅच्युसेट्मस विद्यापीठातून बीई केले. फेसबुक कंपनीत इंटर्नशिप केली. त्यानंतर दुसऱ्या वर्षात त्याने चॅट जीपीटीची निर्मिती करणाऱ्या ओपन एआयमध्ये इंटर्नशिप केली. त्याची प्रचंड बुद्धिमत्ता पाहून कंपनीने त्याला नोकरी दिली. त्यानंतर चॅट जीपीटीचा भाग असणाऱ्या GPT-4o च्या टीमचे नेतृत्व त्याला दिले.
Here's prafulla dhariwal, a young prodigy. Chad vibes were observed from beginning
https://t.co/b5LazKx7Dr https://t.co/SMA6cNCpJU pic.twitter.com/LIVdEJgsEU— Adarsh (@adarshxs) May 16, 2024
GPT-4o हे OpenAI द्वारे डिझाइन केलेले बहुभाषिक, बहुविध जनरेटिव्ह प्री-ट्रेन्ड ट्रान्सफॉर्मर आहे . OpenAI च्या CTO मीरा मुराती यांनी 13 मे 2024 रोजी लाइव्ह-स्ट्रीम केलेल्या डेमो दरम्यान याची घोषणा केली होती. GPT-4o विनामूल्य आहे.