पुण्यात एका ‘मिशन’साठी आलो; चंद्रकांतदादांचा गौप्यस्फोट

| Updated on: Dec 26, 2020 | 4:50 PM

पुण्यात मी एका मिशनसाठी आलो आहे. हे मिशन संपताच मी परत कोल्हापूरला जाईल, असा गौप्यस्फोट भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केला. (party send me pune for a mission says chandrakant patil)

पुण्यात एका मिशनसाठी आलो; चंद्रकांतदादांचा गौप्यस्फोट
Follow us on

पुणे: पुण्यात मी एका मिशनसाठी आलो आहे. मला त्यासाठीच पाठवलं आहे. हे मिशन संपताच मी परत कोल्हापूरला जाईल, असा गौप्यस्फोट भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केला. ते पुण्यात बोलत होते. (party send me pune for a mission says chandrakant patil)

चंद्रकांत पाटील यांनी मी कोल्हापूरला परत जाईन असं विधान करून राजकीय धुरळा उडवून दिला होता. त्यामुळे सत्ताधाऱ्यांनी चंद्रकांत पाटलांवर खोचक टीका केली होती. त्यामुळे चंद्रकांतदादांनी पत्रकार परिषद घेऊन विरोधकांना फैलावर घेतलं. माझ्या वाक्याने कुणी हुरळूनही जाऊ नये आणि घाबरूनही जाऊ नये. मी कुठेच जाणार नाही. मी इथेच राहणार आहे. माझ्या त्या वाक्याचा शब्दश: कुणी अर्थ घेऊ नये, असं चंद्रकांत पाटील म्हणाले. काल गिरीश बापट यांनी एक वक्तव्य केलं होतं. त्यावर मी पुण्यात राह्यला आलो नाही, कोल्हापूरला परत जाईन असं वक्तव्य केलं होतं. तसंही माणसाला कुठं तरी सेटल व्हावंच लागतं. आयुष्याच्या संध्याकाळी मीही कोल्हापूरला सेटल होणार आहे. याचा अर्थ आजच सेटल होणार असं नाही. कधी सेटल होईल सांगता येणार नाही. पाच… दहा… पंधरा… वीस… कितीही वर्षे लागू शकतात, असंही ते म्हणाले.

माझ्या पक्षाने मला एक मिशन दिलं होतं. त्यामुळे मी इथे आलो. मिशन पूर्ण झालं की परत कोल्हापूरला जाणार, असं सांगतानाच हे मिशन काय आहे हे तुम्हाला कशाला सांगू? असंही ते पत्रकारांच्या एका प्रश्नाला उत्तर देताना म्हणाले. माझं मिशन व्यवहारात दिसत आहे. विरोधक बाहेरचे आहेत. त्यांना माझं मिशन दिसत नाही, दिसणार नाही. त्यामुळे चंद्रकांतदादा पुण्यातून गेलेले बरे असं त्यांना वाटतं, असा चिमटाही त्यांनी काढला. कोथरुड विधानसभा निवडणूक लढणं हे मिशन नव्हतं. मिशन दुसरं आहे. पण या शहरात पाय रोवण्यासाठी लोकप्रतिनिधी होणं गरजेचं होतं. त्यामुळे निवडणूक लढलो, असंही ते म्हणाले.

बॅग नेहमीच भरलेली असते

विद्यार्थी परिषदेत असताना अनेक राज्य आणि जिल्हे फिरलो. पक्ष सांगेल ते काम केलं. आताही मी सोलापूरला जाणार आहे. माझी बॅग भरलेलीच आहे. आम्हाला एक ठिकाण नसतं. पण सांगेल त्या ठिकाणी जावं लागतं, असं सांगतानाच मी राज्याचा अध्यक्ष आहे. मला एखाद्या जिल्ह्याचा किंवा भागाचा विचार करता येत नाही. त्यामुळे मी पुण्यात राहिलो काय? कोल्हापूरला थांबलो काय? आणि नागपुरात राहिलो काय? काहीच फरक पडत नाही, असंही त्यांनी शेवटी स्पष्ट केलं. (party send me pune for a mission says chandrakant patil)

 

संबंधित बातम्या:

चंद्रकांत पाटील काल म्हणाले, मी परत जाईन, आज म्हणाले पुन्हा येईन

वर्षभर आम्ही तुमचं ऐकलं, एक दिवस आमचं ऐका, मनसेची मुख्यमंत्र्यांना विनंती

होय, मला ईडीची नोटीस मिळाली, एकनाथ खडसेंची पहिली प्रतिक्रिया

(party send me pune for a mission says chandrakant patil)