पुणे : पिंपरी चिंचवड महापालिकेतील (PCMC) विविध कामांचे ठेके मिळवण्यासाठी कंत्राटदारांकडून देण्यात आलेली बँक गँरंटी बोगस निघाल्याचं प्रकरण भाजप नगरसेवक तुषार कामठे (Tushar Kamathe)यांनी लावून धरलं होतं. तुषार कामठे यांनी पहिल्यांदा या प्रकरणी पिंपरी चिंचवड महापालिकेच्या सभेत आवाज उठवला होता. या प्रकरणी काहीच न झाल्यानं तुषार कामठे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांची भेट घेतली होती. अजित पवार यांची भेट घेतल्यानंतर संबंधित कंत्राटदारावर गुन्हा दाखल झाला. यामुळं तुषार कामठे यांनी अजित पवार यांच्या आभाराचे बॅनर लावल्यानं चर्चा सुरु झाल्या आहेत. तुषार कामठे हे पिंपरी चिंचवडमधील पिंपळे निलख येथील भाजप नगरसेवक आहेत. आपण आज दाकवून दिले जे चुकीचे आहे ते चुकीचेच आहे. भ्रष्टाचार नष्ट झालाच पाहिजे मग तो भ्रष्टाचारी कोणी का असेना. अजित पवार यांच्या नि:पक्षपाती निर्णयामुळं ‘सिक्युअर आयटी फॅसिलिटी मॅनेजमेंट’ या घोटाळेबाज कंपनीवर कुन्हा दाखल झाला आहे. त्याबद्दल दादा आपले मनस्वी आभार, असं तुषार कामठे म्हणाले आहेत.
पिंपरी चिंचवड मधील भाजप नगरसेवक तुषार कामठे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या आभाराचे बॅनर्स लावले आहेत.पिंपळे निलख भागातील भाजप नगरसेवक तुषार कामठे यांनी शहरात विविध ठिकाणी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या आभाराचे बॅनर्स लावल्याने शहरभर चर्चा सुरू झाल्या आहेत.
सिक्युअर आय़टी फॅसिलिटी मॅनेजमेंट प्रा. लि या कंपनी मालकाने बनावट प्रमाणपत्रे दाखल केल्याची तक्रार भाजप नगरसेवक तुषार कामठे यांनी केल्या नंतर ते उपमुख्यमंत्री अजित पवार यांना भेटले. तात्काळ त्या ठेकेदार आणि कंपनी विरोधात पिंपरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्याच संदर्भात त्यांनी अजित पवार यांच्या आभाराचे बॅनर्स शहरात विविध ठिकाणी लावलेत. दादा, तुमचे खूप आभार !आपण आज दाखवून दिले जे चुकीचे आहे,ते चुकीचेच आहे.भ्रष्टाचार नष्ट झालाच पाहिजे, मग भ्रष्टाचारी कोणी का असेना.
अजित पवार यांनी घेतलेल्या निर्णयामुळं पिंपरी चिंचवडकर मधील करदात्याचे 55 कोटी वाचवले. नि:पक्षपाती निर्णयामुळे सिक्युअर आय़टी फॅसिलिटी मॅनेजमेंट या घोटाळेबाज कंपनीवर गुन्हा दाखल झाला. त्याबद्दल दादांचे मनस्वी आभार अशा आशयाचा मजकूर या बॅनर्स वर आहे.
इतर बातम्या:
17 हजार शेतकऱ्यांना पशुसंवर्धन विभागाच्या योजनेचा लाभ, शेतीच्या जोडव्यवसायाला मिळणार आधार