रेल्वे स्थानकावर बॉम्ब ठेवल्याचा फोन करणाऱ्यास अटक, धमकी देण्याचे सांगितले धक्कादायक कारण

| Updated on: Jul 18, 2023 | 3:27 PM

Pune Crime News : दादर रेल्वे स्थानकावर बॉम्ब ठेवला असल्याचा फोन पोलिसांना आला होता. परंतु तो कॉल फेक असल्याचे निष्पन्न झाले होते. पोलिसांनी या प्रकरणातील आरोपीला अटक केली आहे. त्याने फोन का केला होता ते ही सांगितले...

रेल्वे स्थानकावर बॉम्ब ठेवल्याचा फोन करणाऱ्यास अटक, धमकी देण्याचे सांगितले धक्कादायक कारण
hoax call
Follow us on

पुणे | 18 जुलै 2023 : पुणे पोलिसांच्या नियंत्रण कक्षाला बॉम्ब ठेवल्याचा फोन आला होता. दादर रेल्वे स्थानकावर बॉम्ब ठेवल्याचा दूरध्वनी आल्यानंतर पोलीस अलर्ट झाले. त्यानंतर मुंबई लोहमार्ग पोलिसांनी दादर रेल्वे स्थानकाची कसून तपासणी केली. परंतु हा कॉल फेक असल्याचे स्पष्ट झाले. या प्रकरणी आरोपीला अटक करण्यात आली. त्याचे चौकशी केली असता सुरवातीला उडवाउडवीची उत्तरे दिला. त्यानंतर जे कारण सांगितले ते धक्कादायक होते. अटक करण्यात आलेला आरोपी एक हॉटेलमध्ये वेटर म्हणून काम करतो.

काय आहे प्रकार

आरोपी योगेश शिवाजी ढेरे याने पुणे नियंत्रण कक्षाला फोन केला. दादार रेल्वे स्थानकावर बॉम्ब ठेवला असल्याचा फोन त्याने केला. त्याच्या फोननंतर लोहमार्ग पोलिसांनी दादर स्थानकाची कसून तपासणी केली. परंतु काही संशयास्पद मिळाले नाही. या प्रकरणात पोलीस हवालदार प्रशांत सुतार यांनी फिर्याद दिली. त्यानंतर लोणी काळभोर पोलिसात गुन्हा दाखल झाला.

पोलिसांनी केला तपास सुरु

रेल्वे स्थानकावर आलेला कॉल फेक असल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर पोलिसांनी आरोपीचा शोध सुरु केला. पोलिसांना ज्या क्रमांकावरून फोन आला तो क्रमांक कोणाचा त्याचा शोध घेण्यात आला. त्यानंतर तांत्रिक विश्लेषण केल्यानंतर हा मोबाईल क्रमांक योगेश ढेरे याचा असल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर त्याला अटक करण्यात आली.

हे सुद्धा वाचा

का केला फोन

योगेश ढेरे याला अटक केल्यानंतर त्याची चौकशी सुरु केली. आधी त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली. परंतु त्याची अधिक चौकशी केली तेव्हा तो बोलू लागला. लोकांमध्ये घबराट निर्माण होवून, धावपळ उडावी, यासाठी आपण फोन केल्याचे त्याने सांगितले. योगेस ढेरे हा काळभोर येथील एका हॉटेलमध्ये वेटर आहे. पाच वर्षांपूर्वी त्याचा अपघात झाला. त्यावेळी त्याच्या डोक्याला दुखापत झाली होती, असे त्यांची कुटुंबियांनी पोलिसांना सांगितले. यासंदर्भातील वैद्यकीय अहवालसुद्धा त्याच्या कुटुंबियांनी पोलिसांना दिला.