बेपत्ता अल्पवयीन मुलीची हत्या तिच्याच जवळच्या…; मोबाईलमुळे सापडले आरोपी…

| Updated on: Apr 05, 2023 | 11:28 PM

मृतदेह पोलिसांना मिळताच त्याची तपासणी केली असता मृतदेहावर धारदार शास्त्राने वार केल्याचे दिसून आले आहेत. ही हत्या प्रेमप्रकरणातून झाल्याचे पोलिसांनी सांगितले असून पुढील तपास पोलीस करत आहेत.

बेपत्ता अल्पवयीन मुलीची हत्या तिच्याच जवळच्या...; मोबाईलमुळे सापडले आरोपी...
Follow us on

पिंपरी चिंचवड : पिंपरी चिंचवडच्या चिखली परिसरातून बेपत्ता झालेल्या अल्पवयीन मुलीचा मृतदेह आढळून आल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. मागील तीन दिवसांपासून चिखली परिसरातून अल्पवयीन मुलगी बेपत्ता असल्याची तक्रार त्यांच्या कुटुंबीयांनी केली होती. त्यामुळे गेल्या तीन दिवसांपासून मुलीचे कुटुंबीय आणि पोलीस प्रशासनही तिचा शोध घेत होते. मात्र आज तिचा मृतदेह आढळून आल्याने चिखलसह परिसरात खळबळ उडाली आहे. अल्पवयीन मुलीचा मृतदेह मिळाल्यानंतर तिची हत्या करण्यात आल्याचेही पोलिसांनी सांगितले.

गेल्या तीन दिवसांपासून बेपत्ता असलेल्या मुलीचा मृतदेह आज मिळाल्याने अनेकांना या घटनेमुळे धक्का बसला आहे. मात्र पोलिसांनी जलदगतीने तपासाची सूत्रे फिरवल्यानंतर तिच्याच दोन अल्पवयीन मित्रांनी तिच्या हत्या केल्याचं उघड झालं आहे.

या दोन्हीही अल्पवयीन मित्रांना पोलिसांनी ताब्यात घेतले असून आता पुढील तपास सुरू करण्यात आला आहे.
या दोघांपैकी एका मित्रावर तिने 2022 मध्ये बलात्कार केल्याची तक्रारही दाखल केली होती.

आज मुलीचा मृतदेह आढळून आल्यानंतर पोलिसांनी तपास सुरु केल्यानंतर संशयित दोघांचेही मोबाईल लोकेशन मृतदेह असलेल्या ठिकाणी आढळले होते. त्यानंतर पोलिसांनी या दोघांनाही अटक केली आहे.

मृत अल्पवयीन मुलीने या दोघांना एका मुलाचा फोटो दाखवत हा माझा नवीन मित्र असल्याचे सांगत त्यांना चिडवायला सुरुवात केली होती. त्या रागातूनच त्यांनी ही हत्या केल्याचं प्राथमिक तपासात उघड झाल आहे.

चिखली परिसरातून बेपत्ता झालेल्या मुलीचा शोध घेणे सुरूच होते, मात्र आज चिखली घरकूल परिसरातील सांस्कृतिक भवनच्या चालू बांधकाम साईटवर त्या मुलीचा मृतदेह आढळून आला होता.

मृतदेह पोलिसांना मिळताच त्याची तपासणी केली असता मृतदेहावर धारदार शास्त्राने वार केल्याचे दिसून आले आहेत. ही हत्या प्रेमप्रकरणातून झाल्याचे पोलिसांनी सांगितले असून पुढील तपास पोलीस करत आहेत.