पिंपरी चिंचवड : मार्च महिना आला म्हणजे सर्वच शासकीय विभागाची घावपळ सुरु होते. एकीकडे मार्च अखेरपर्यंत असलेले बजेटमधील निधी खर्च करायचा असतो तर दुसरीकडे वसुलीचे टार्गेट असते. जास्तीत जास्त वसुली करण्यासाठी सर्व अधिकारी व कर्मचारी प्रयत्न करीत असतात. पुणे जिल्ह्यातील पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या कर संकलन विभागाने विक्रमी कर वसुली केली आहे. अजून मार्च महिन्याचे दहा दिवस असताना कर वसुलीचा 700 कोटींचा टप्पा ओलांडला आहे. मिळकत करातून ही वसूल केली गेलीय. येत्या दहा दिवसांत वसुली मोहीम अधिक तीव्र करण्यात येणार आहे.
काय वापरला फंडा
आता मार्च अखेर असल्याने मिळकत कर उत्पन्न आणखी वाढवण्याच्या दृष्टीने महापालिकेने एक लाखाहून अधिक थकबाकी असलेल्या मिळकत कर धारकांची नावे थेट वर्तमान पत्रात प्रसिद्ध करण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे मोठ्या थकबाकीदरांचे धाबे दाणाणले आहे. कर संकलन विभागाच्या या निर्णयामुळे अनेक जण कर भरण्यासाठी पुढे येत असल्याचे चित्र आहे. मात्र अशा पद्धतीने नावे जाहीर करण्यास काही जणांनी विरोध दर्शवला आहे.
सर्वसामान्य नागरिक आपले कर नियमित भरत असतात. परंतु काही मोठ्या थकबाकीदारांकडून कर भरले जात नाही. राजकीय वरदहस्तामुळेही मिळकत कर वसुली थकलेली असते. परंतु आता मनपाने कठोर भूमिका घेऊन वसुली सुरु केली आहे. यामुळेच थकबाकीदारांचे धाबे दणाणले आहे.
पिंपरी चिंचवडला दिलासा
गेल्या चार दिवसात पिंपरी चिंचवड शहरात H3N2 चा एकही रुग्ण नाही. जानेवारीपासून ते 14 मार्च पर्यंत एकूण 7 रुग्ण आढळून आले होते त्यापैकी 6 जण बरे होऊन घरी गेले तर एकाच मागील आठवड्यात मृत्यू झाला. H3N2साठी महापालिका प्रशासनाने प्रत्येक ठिकाणी दहा असे एकूण साठ बेड आरक्षित ठेवले आहेत. त्यात वायसीएम रुग्णालय, नवीन थेरगाव रुग्णालय, नवीन भोसरी रुग्णालय, नवीन जिजामाता रुग्णालय, कै ह.भ.प. कुटे मेमोरियल हॉस्पिटल आणि आकुर्डी रुग्णालयाचा समावेश आहे.
आज पुणे मनपाचा अर्थसंकल्प
पुणे महापालिकेचे 2023-24 या आर्थिक वर्षाचे अंदाजपत्रक शुक्रवारी सादर होणार आहे. पुणे मनपाच्या इतिहासात पहिल्यांदाच स्थायी समिती आणि मुख्य सभेशिवाय प्रशासक म्हणून आयुक्त विक्रम कुमार अंदाजपत्रक सादर करणार आहे. दरवर्षी महापालिका प्रशासनाकडून जानेवारी महिन्यात अंदाजपत्रक स्थायी समितीला सादर केले जाते.
पिंपरी-चिंचवड मनपात भरतीचा मोठा घोटाळा, उच्चपदस्थ अधिकाऱ्यांची बोगस भरती…सविस्तर वाचा