पुणे : काही दिवसात पंतप्रधान मोदी (PM Modi) हे देहूत (Dehu) येणार आहेत. भाजपच्या नेत्यांनी काही दिवसांपूर्वीच दिल्लीत दाखल होत मोदींना वारीसाठी निमंत्रण दिलं होतं. मोदींचा दौरा अनेक दिवसांपासून गाजतोय, मात्र आता या दौऱ्याआधी लागलेले बॅनरच आणि त्या बॅनरवरील फोटोंची जास्त चर्चा होतेय. संत ज्ञानेश्वर महाराजांनी वारकरी (Warkari) संप्रदायाचा पाया रचून संत तुकाराम महाराजांनी त्यावर कळस चढविला. पिंपरी-चिंचवड शहरात भाजपाने जाणीवपूर्वक मोदींचा फोटो पांडुरंगापेक्षा जाणीवपूर्वक मोठा दाखवून वारकरी संप्रदायाचा अवमान केला आहे. वारकरी संप्रदायामध्ये विठ्ठलापेक्षा कोणीही मोठा नसताना मोदींचा फोटो मोठा दाखवून वारकरी संप्रदायाचा अपमान केला आहे, असा आरोप आता राष्ट्रवादीकडून करण्यात आलाय. राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्याध्यक्ष रविकांत वरपे यांनी या बॅनरचे काही फोटो ट्विट करत भाजपवर हल्लाबोल चढवला आहे. त्यामुळे हा वाद आता आणखी वाढण्याची शक्यता आहे.
संत ज्ञानेश्वर महाराजांनी वारकरी संप्रदायाचा पाया रचून संत तुकाराम महाराजांनी यावर कळस चढविला.पिं-चिंचवड येथे भाजपाने जाणीवपूर्वक मोदींचा फोटो पांडुरंगापेक्षा जाणीवपूर्वक मोठा दाखवून संप्रदायाचा अवमान केला आहे.@NCPspeaks @BJP4Maharashtra @BJP4India @TV9Marathi @SarkarnamaNews pic.twitter.com/2lwL9rcUAk
— Ravikant Varpe – रविकांत वरपे (@ravikantvarpe) June 11, 2022
राष्ट्रवादीकडून एवढे फोटोच ट्विट गेले नाहीतर तर विटेवरी उभा बा विठ्ठलापेक्षा मोठा कोणी नाही. पिंपरी चिंचवड शहर भाजपाने मोदींना विठ्ठलापेक्षाही मोठे दाखवण्याचे पाप केले आहे. वारकरी संप्रदायाची बदनामी वारकरी संप्रदाय खपवून घेणार नाही. भाजपाने वारकरी संप्रदायाची माफी मागावी. असा इशारा देत त्यांनी माफी मागावी अशी मागणीही आता राष्ट्रवादीकडून करण्यात आलीय.
विटेवरी उभा बा विठ्ठलापेक्षा मोठा कोणी नाही. पिंपरी चिंचवड शहर भाजपाने मोदींना विठ्ठलापेक्षाही मोठे दाखवण्याचे पाप केले आहे. वारकरी संप्रदायाची बदनामी वारकरी संप्रदाय खपवून घेणार नाही. भाजपाने वारकरी संप्रदायाची माफी मागावी.@zee24taasnews @TV9Marathi @abpmajhatv @SarkarnamaNews pic.twitter.com/1yniRHfgzl
— Ravikant Varpe – रविकांत वरपे (@ravikantvarpe) June 11, 2022
पंतप्रधान नरेंद्र मोदी त्याच्या 14 तारखेला देहू दौऱ्यावर आहेत. त्यांच्या हस्ते जगद्गुरु संत तुकाराम महाराज यांच्या शिळा मंदिराचं लोकार्पण करण्यात येणार आहे. यावेळी देहू संस्थानच्या वतीने खास डिझायनर तुकाराम पगडी आणि उपरणं देऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा सत्कार करण्यात येणार आहे. पुण्यातील मुरूडकर झेंडेवाले यांनी देहू देवस्थानच्या मागणीनुसार ही खास डिझायनर तुकाराम पगडी आणि उपरणं तयार केल आहे. पूर्ण रेशीम सिल्कचा वापर करून ही पगडी तयार करण्यात आलीये.
तसेच पंतप्रधान मोदी येत आहेत म्हटल्यावर त्यांच्या सुरक्षेचीही पुरेपूर काळजी घेण्यात येत आहे. त्यासाठी उद्यापासून मंदिर दर्शनासाठी बंद ठेवण्यात आले आहे. कोरोनाने दोन वर्षाचा ब्रेक लावल्यानंतर यंदा पायी वारी निघत आहे. त्यामुळे वारकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. मात्र आता हा फोटोचा वाद राजकारण तापवतोय.