योगेश बोरसे, पुणे | 20 जुलै 2023 : पीएमपीचे अध्यक्ष सचिंद्र प्रताप सिंह सध्या चर्चेत आहेत. प्रवाशांना अधिक चांगल्या सुविधा देण्यासाठी त्यांनी काम सुरु केले आहे. सूत्र घेताच त्यांनी बसमधून दैनंदिन प्रवास केला. बस थांब्यावर न थांबणाऱ्या चालकांचा अनुभव त्यांना या प्रवाशांदरम्यान आला. त्यानंतर चालकांना शिस्त लावण्याचे काम त्यांनी केले. प्रवाशांना नेमके काय हवे आहे, त्यांच्या अडचणी काय आहेत, याची माहिती सचिंद्र प्रताप सिंह यांनी घेतली. आता प्रवाशांसाठी आणखी एक महत्वाचा निर्णय त्यांनी घेतला आहे.
पुणे शहर, पिंपरी चिंचवड आणि जिल्ह्यातील प्रवाशांसाठी पीएमपी पहिल्या टप्प्यात सुमारे ३०० आच्छादित बस थांबे उभारणार आहेत. त्यासाठीची निविदा प्रक्रिया पूर्ण झाली आहे. पीएमपी प्रशासनाने यासंदर्भात माहिती दिलीय. पुणे शहर, जिल्हा आणि पिंपरी चिंचवडमध्ये पीएमपीचे सुमारे पाच हजार बस थांबे आहेत. त्यातील केवळ ११३० थांबे आच्छादित आहेत. त्यामुळे पावसाचा, उन्हाचा त्रास अनेक प्रवाशांना होता. आता पहिल्या टप्प्यात बीओटी तत्त्वावर ३०० थांबे आच्छादित करण्यात येणार आहे.
शहरात अन् परिसरात आच्छादित बस थांबे नाही. त्यामुळे प्रवाशांची गैरसोय होत असल्याने पीएमपीने हा निर्णय घेतला आहे. पीएमपीच्या सुमारे दोन हजार बसमधून दररोज ११ लाख प्रवाशांची ३७५ हून अधिक मार्गांवर वाहतूक होते.
पीएसपी बसस्थानके आच्छादित करण्यासाठी बांधा, वापरा आणि हस्तांतरीत करा म्हणजे बीओटीचा अंमलबाजावणी करणार आहे. त्यासाठी संबंधित ठेकेदार खर्च करणार आहे. त्यावर त्यावर जाहिराती करता येणार आहे. त्यासाठी पीएमपीकडून १५ वर्षांचा करार करण्यात येणार आहे. पहिल्या टप्प्यात ९० दिवसांत ५० थांबे उभारणार आहे. त्यानंतर उर्वरित थांबे आठ ते दहा महिन्यांत पूर्ण करण्यात येतील.
ही ही वाचा
चालकाने बस थांबवली नाही, तो व्यक्ती बससाठी धावत होतो, मग संदेश आला अन् चालकाचे धाबे दणाणले