पुणे: महाराष्ट्रातील महत्त्वाचं शहर म्हणून पुण्याची ओळख आहे. पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये सार्वजनिक बससेवा पीएमपीएलकडून पुरवली जाते. पुण्यातून इतर ठिकाणी जाण्यासाठी सार्वजनिक वाहतुकीसाठी रेल्वे, विमानसेवा, राज्य परिवहन महामंडळाच्या एसटी बसेस ही प्रमुख साधनं आहेत. तर, पुणे आणि पिंपरी चिचंवडमधील नागरिकांना पीएमपीएलकडून बससेवा पुरवली जाते. पीएमपीएल आता पुढचं पाऊल टाकण्याच्या तयारीत असल्याची माहिती आहे. पीएमपीएल ई-कॅब सेवा देण्याचे नियोजन करत आहे. पीएमपीएलच्या ताफ्यात गेल्या काही दिवसांपूर्वी ई-बस देखील दाखल झाल्या होत्या.
पीएमपीएल ई-कॅब सेवा पुरवणार
पुणे आणि पिंपरी-चिंचवडमध्ये ठरावीक अंतरासाठी प्रवाशांना ई-कॅब सेवा देण्याचे पीएमपीचे नियोजन आहे. पहिल्या टप्प्यात 100 ते 200 मोटारी पीएमपीच्या ताफ्यात दाखल होऊ शकतात,अशी माहिती आहे.
स्वस्तात सेवा पुरवणार?
पीएमपीएल तर्फे सुरु केली जाणारी ई-कॅब सेवा ही इतर कॅब सेवा पुरवणाऱ्या कंपन्यांच्या तुलनेत आणि रिक्षाच्या तुलनेत ही सेवा स्वस्त असेल, असा दावा पीएमपीएलकडून करण्यात आला आहे.
राज्यातील पहिलाच प्रकल्प
सार्वजनिक क्षेत्रातील परिवहन सेवेच्या माध्यमातून ई-कॅबद्वारे प्रवाशांना सेवा देण्याचा हा पहिलाच प्रयत्न आहे. विमानतळ, एसटी, रेल्वे स्थानक तसेच बाजारपेठेत जाण्यासाठी या कॅब प्रवाशांना उपलब्ध असतील, अशी माहिती मिळत आहेत.
ई-बाईक रेटिंग प्रोजेक्ट राबवण्यासाठी पुणे महानगरपालिकेच्या स्थायी समितीनं मान्यता दिली आहे. शहरातील मुख्य रस्त्यांवरील पाचशे ठिकाणी 2 हजार चार्जिंग पॉईंट्स उभारण्याचं नियोजन पुणे महापालिकेनं केलं आहे. पुणे महानगरपालिकेच्या या उपक्रमामुळे पुणे शहरातील वायू आणि ध्वनी प्रदुषण काही प्रमाणात कमी होण्यास मदत होणार आहे.
पुणे महापालिकेनं राबवलेल्या या उपक्रमाद्वारे सुरुवातीच्या टप्प्यात 3 हजार ते 5 हजार ई-बाईक वापरात आणण्याची संकल्पना आहे. महत्वाची बाब म्हणजे संपूर्ण देशात दुचाकी इलेक्ट्रिक वाहतूक सेवा देणारं पुणे हे पहिलं शहर ठरणार आहे. अंतिम मान्यतेनंतर अवघ्या तीन महिन्यांनी हा प्रकल्प पुणेकरांसाठी तयार होणार आहे. या प्रकल्पासाठी सर्व गुंतवणूक ही विट्रो मोटर्स प्रा. लि. ही कंपनी करणार आहे. पुणे महानगरपालिकेची या प्रकल्पामध्ये कुठलीही आर्थिक गुंतवणूक असणार नाही.ई-बाईक प्रकल्पाचा प्रस्ताव शहर सुधारणा समितीचे अध्यक्ष अमोल बालवडकर यांच्या संकल्पनेतून विट्रो मोटर्सने मांडला होता. ग्रीन पुणेसाठी ई-बाईक रेटींग प्रोजेक्ट ही संकल्पना राबवण्यात येणारे.
इतर बातम्या:
पुण्यातील प्रवाशांना दिलासा, ‘पीएमपीएल’च्या बसेसची संख्या वाढली
Nagpur ZP : नागपूर जिल्हा परिषदेच्या 16 जागांसाठी 79 उमेदवार रिंगणात, महाविकास आघाडीची रणनीती काय?
PMPL will start E Cab service in Pune and Pimpari Chinchwad said reports