पुणे: गेल्या 12 दिवसांपासून पीएमपीएमएलच्या स्वारगेट येथील कार्यालयासमोर वाहक पदाचे परीक्षार्थीचे आंदोलन सुरू आहे. 2016 साली पीएमपीएमलने (PMPML) वाहक पदासाठी ज्या उमेदवारांची भरती करण्याची हमी दिली होती, ती पूर्ण करण्याची मागणीसाठी हे आंदोलन सुरु आहे. (Protest in Pune for PMPML pending recruitment)
पीएमपीएमएलने 2016 साली 4900 वाहक पदासाठी भरती प्रक्रिया राबविली. 1 जुलै 2017 ला यासाठी परीक्षा पार पाडली. यात जवळपास 261 उमेदवार पात्र ठरले. भरती प्रक्रिया टप्याटप्याने राबविण्यात आली. दुसऱ्या टप्प्यात 400 उमेदवार पात्र ठरले. असे एकूण 661उमेदवार वाहक म्हणून रुजू झाले. थोड्या दिवसांनी तिसरी प्रतीक्षा यादी जाहीर झाली. यात 1784उमेदवारांचा समावेश होता. मात्र थोड्या दिवसांत देशात लॉकडाऊन लागला. त्यामुळे ही यादी थांबवली गेली.
त्यावेळी पीएमपी प्रशासनने उमेदवारांना लॉकडाऊन निघाल्यावर तुम्हाला सेवेत सामावून घेऊ, असे सांगितले असल्याचे उमेदवाराचे म्हणणे आहे. मात्र पीएमपीने ही तिसरी यादी रद्द करून आता पुन्हा नव्याने भरती प्रक्रिया राबविले जाणार असल्याचे सांगितल्याने उमेदवार हवालदिल झाले आहेत. तेव्हा नव्याने भरती प्रक्रिया न राबविता आधीच्या प्रक्रियेतील उमेदवाराचा यादी ग्राह्य धरावी, अशी मागणी या आंदोलनकर्त्यांची आहे.
विधिमंडळाच्या (Maharashtra Monsoon Session 2021) कामकाजाला सुरुवात झाली आणि विरोधकांनी सुरुवातीलाच एमपीएससी (MPSC) आणि स्वप्निल लोणकरच्या (Swapnil Lonkar) आत्महत्येवरुन सरकारला धारेवर धरलं. विरोधी पक्षनेत्यांच्या म्हणण्याला उत्तर देताना उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी मोठी घोषणा केली. 31 जुलै 2021 पर्यंतच्या एमपीएससीच्या सर्व रिक्त जागा भरु, अशी घोषणा अजित पवार यांनी विधानसभेत केली.
स्वप्नील लोणकरच्या आत्महत्येचे पडसाद आज विधिमंडळात उमटलेले पाहायला मिळाले. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आक्रमक भूमिका घेत सरकार एमपीएससीवर काय पावलं उचलणार आहे, हे जाहीर करावं, असं आव्हान दिलं. तसंच सुरुवातीलाच स्वप्निल लोणकरची सुसाईड नोट फडणवीसांनी सभागृहात वाचून दाखवली. ही सुसाईट नोट अतिशय संवेदनशील आहे. कोणाच्याही हृदयाला पाझर फुटेल असं हे पत्र आहे. सरकारला पाझर फुटणार आहे की नाही?, असं विचारत सगळं कामकाज बाजूला ठेऊन एमपीएससीवर त्वरित चर्चा घ्यावी, असं फडणवीस म्हणाले.
संबंधित बातम्या:
Jobs News: ESIC मध्ये रेसिडंट ऑफिसर पदावर भरती प्रक्रिया, मुंबई येथे थेट मुलाखतीद्वारे निवड
(Protest in Pune for PMPML pending recruitment)