पुणे : पुण्याची सार्वजनिक वाहतूक सेवा पीएमपीएमएल (PMPML) एक अनोखी सेवा (Service) पुणेकरांना देणार आहे. बस डेच्या (Bus day) दिवशी पीएमपी स्रवतंत्र लेनमधून प्रवाशांना सेवा देणार आहे. पाच प्रमुख मार्गांवर ही सेवा दिली जाणार आहे. यासाठी वाहतूक पोलीस, स्वयंसेवी संस्थांचे स्वयंसेवक यांच्याकडून पीएमपीला सहकार्यही मिळणार आहे. 19 एप्रिल यादिवशी पीएमपीचा वर्धापनदिन आहे. त्याच्या आदल्या दिवशी पीएमपीकडून बस डे साजरा करण्यात येणार आहे. यादिवशी पीएमपी आपल्या ताफ्यातील 1800 बस रस्त्यावर उतरविणार आहे. यामुळे वाहतूककोंडी होण्याचीही शक्यता आहे. त्यामुळे प्रवाशांनी सार्वजनिक वाहतूक सेवेचा यादिवशी लाभ घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. तसेच पाच स्वतंत्र मार्गांवर ही सेवा दिली जाणार आहे. या सेवेचा लाभ घ्यावा, असे आवाहनही पीएमपी प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.
– जंगली महाराज रस्ता
– फर्ग्यूसन कॉलेड रस्ता
– कोथरूड डेपो ते डेक्कन
– स्वारगेट ते शिवाजी नगर
– शिवाजीनगर ते स्वारगेट (बाजीराव आणि शिवाजी रोड मार्ग)
पीएमपीच्या या लकी ड्रॉनुसार प्रथम विजेत्याला एक वर्षाचा मोफत प्रवास करता येणार आहे. एक वर्षाचा पास त्याला दिला जाईल. तर दुसऱ्या विजेत्याला सहा महिने आणि तिसऱ्या विजेत्याला ज्यात 14 जण असतील, त्यांना तीन महिने मोफत प्रवास करता येणार आहे. त्यामुळे या लकी ड्रॉमध्ये प्रवाशांनी सहभागी व्हावे, असे आवाहन पीएमपी प्रशासनाने केले आहे.
सातवा वेतन आयोग लागू होऊनही पगारवाढ न दिल्याने पीएमपीचे कर्मचारी नाराज आहेत. ते 18 एप्रिलला काळ्या फिती बांधून निषेध करणार आहेत. पीएमपी प्रशासनाने वर्धापन दिनानिमित्त आठ दिवस विविध कार्यक्रम आयोजित केले आहेत. त्यासाठी खर्चही मोठ्या प्रमाणात करण्यात आला आहे. तर दुसरीकडे कर्मचारी मात्र पगारवाढ नसल्याने निषेध करणार आहेत. महापालिकेकडून निधी मिळूनही प्रशासकीय अधिकारी सातव्या वेतन आयोगानुसार पगारवाढ देत नाहीत, त्याचे कारण काय, असा सवाल करण्यात आला आहे.