Pune Crime | पुण्यात वृद्ध महिलेच्या दीड लाखांच्या शेळ्यांवर डल्ला मारणाऱ्याच्या पोलिसांनी आवळल्या मुसक्या ; काय आहे प्रकरण

| Updated on: Feb 16, 2022 | 9:36 AM

या व्यक्तीकडे कोणत्याही प्रकारच्या शेळ्या नसताना तो विक्रीसाठी शेळ्या घेऊन गेल्याने त्याच्यावर संशय बळावळा. त्यानंतर माहिती मिळाली की ही व्यक्ती त्याच्या नानावडे येथील घरी येणार आहे. माहिती मिळताच स्थानिक गुन्हे शाखेचे पथक नानावडे येथे रवाना करण्यात आले. त्याच्या घरी जाऊन त्याचा शोध घेतला असता पोलिसांची चाहुल लागताच घराचे बाजूस असलेल्या जंगलात तो पळून जाऊ लागला पण गुन्हे शाखेच्या पथकाने त्याला सिनेस्टाईल पाठलाग करून पकडले.

Pune Crime |  पुण्यात वृद्ध महिलेच्या दीड लाखांच्या शेळ्यांवर डल्ला मारणाऱ्याच्या पोलिसांनी आवळल्या मुसक्या ; काय आहे प्रकरण
crime
Image Credit source: TV9
Follow us on

सुनिल थिगळे, पुणे – जुन्नर तालुक्यातील मेनुंबरवाडी येथे शेळीपालन (Goat farming )करणाऱ्या वृद्ध महिलेच्या विविध जातीच्या दीड लाख किमतीच्या शेळ्या चोरीला गेल्याच्या घटना काही दिवसांपूर्वी घडली होती. याबाबत 72  वर्षीय वृद्ध महिलेने घोडेगाव पोलीस स्टेशनमध्ये (Ghodegaon Police Station)याबाबत 11 फेब्रुवारीला त तक्रार दाखल केली होती. महिलेच्या उदर निर्वाहाचे साधन असलेल्या शेळ्या तातडीने शोधून, चोरी करणाऱ्याचा शोध घेण्याचे आदेश वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी स्थानिक गुन्हे शाखेच्या(crime branch) पथकाला दिले होते. चोरीच्या घटनेनंतर धुंदाबाई लुमाजी भालचिम रा.मेनुंबरवाडी आसाने ता. जुन्नर, असे पीडित फिर्यादी महिलेचे नाव आहे. यावृद्ध महिलेच्या मेनुंबरवाडी येथे असलेल्या शेळ्यांच्या गोठ्यातून अज्ञात व्यक्तीने कुलूम उघडून विविध जातीच्या1,48,000  रुपये किमतीच्या एकूण 15  शेळ्या चोरल्या होत्या. पोलिसांनी तातडीने तपास करता शेळ्या चोराच्या मुसक्या आवळल्या आहेत.

अशी झाली चोरी
पीडित धुंदाबाई लुमाजी भालचिम यांचा मेनुंबरवाडी येथे  शेळ्यांच्या गोठा आहे. घटनेच्या दिवशी शेळ्यांच्या गोठ्यातून अज्ञात व्यक्तीने कुलूम उघडून विविध जातीच्या 1,48,000 रुपये किमतीच्या एकूण 15  शेळ्या चोरल्या होत्या, शेळयाची चोरी झाल्याचे लक्षात येताच वृद्ध महिलेने पोलीस स्टेशन गाठतआपली व्यथा मांडत मांडली व शेळ्यांची चोरीची फिर्याद पोलिसात नोंदवली. महिलेच्या तक्रारीनुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पथकाणे शोध घेण्यास सुरवात केली.

सिनेस्टाईल पाठलाग करून पकडले

घोडेगाव भागात चोराचा शोध घेत असताना गोपनीय बातमीदारामार्फत स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस हवालदार दीपक साबळे यांना बातमी मिळाली की सीताराम खेमा भालचिम रा. नानावडे ता. आंबेगाव हा चाकण येथील बाजारात शेळ्या विकण्यासाठी गेला होता. या व्यक्तीकडे कोणत्याही प्रकारच्या शेळ्या नसताना तो विक्रीसाठी शेळ्या घेऊन गेल्याने त्याच्यावर संशय बळावळा. त्यानंतर माहिती मिळाली की ही व्यक्ती त्याच्या नानावडे येथील घरी येणार आहे. माहिती मिळताच स्थानिक गुन्हे शाखेचे पथक नानावडे येथे रवाना करण्यात आले. त्याच्या घरी जाऊन त्याचा शोध घेतला असता पोलिसांची चाहुल लागताच घराचे बाजूस असलेल्या जंगलात तो पळून जाऊ लागला पण गुन्हे शाखेच्या पथकाने त्याला सिनेस्टाईल पाठलाग करून पकडले. त्याच्याकडे त्याचे नाव पत्ता विचारले असता त्याने त्याचे नाव सीताराम खेमा भालचिम. वय 39 रा. नानावडे ता. आंबेगाव जि. पुणे असे सांगितले. त्याच्याकडे या गुन्ह्याविषयी चौकशी केली असता त्याने हा गुन्हा केल्याची कबुली दिली.त्याने चोरलेल्या 12  शेळ्या ह्या खेड तालुक्यातील चाकण च्या गुरांच्या बाजारात विकल्याची कबुली दिली. त्यापैकी तीन शेळ्या जुन्नर येथील एका व्यापाऱ्याकडून जप्त करण्यात आल्या आहेत.

पोलीस अधीक्षक, डॉ. अभिनव देशमुख साो. मा. अप्पर पोलीस अधीक्षक मितेश गट्टे सो, उपविभागीय पोलिस अधिकारी मंदार जावळे सो यांच्या सूचनेनुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अशोक शेळके यांच्या मार्गदर्शनाखालीया सपोनि. नेताजी गंधारे,पोहवा. दिपक साबळे,पोहवा.विक्रम तापकीर, पोहवा.राजू मोमीन, पो. ना. संदिप वारे, पो. कॉ. अक्षय नवले, पो. कॉ प्रसन्न घाडगे,चा.स फौज. मुकुंद कदम ,पोलीस मित्र प्रसाद पिंगळे. यांनी केली आहे.

कंटेनर गेटला घासत नाही ना? ड्रायव्हर उतरताच गाडी अचानक पुढे, गेटमध्ये अडकून जागीच मृत्यू

Nagpur Collector | नागपूर जिल्ह्यातील उद्याने, बगीचे केव्हा सुरू होणार?, जिल्हाधिकारी विमला यांनी दिली माहिती

सांगलीच्या धनराज कोळेकरची भरारी, 19 व्या वर्षी इंडियन नेव्हीत अधिकारीपदी निवड, हलगीच्या गजरात मिरवणूक