पुणे – येत्या मार्च महिन्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime Minister Narendra Modi)महामेट्रोच्या (Mahametro)उद्घटनासाठी पुण्याच्या दुरीवर येणार आहेत. याच दरम्यान पुण्यातील मुठा आणि मुळा नद्यांच्या संवर्धनासाठी महापालिकेकडून राबवल्या जाणाऱ्या प्रकल्पाचे उद्घाटनही मोदींच्या हस्ते करण्यात येणार असल्याची माहितीसमोर आली आहे. नद्यांच्या स्वच्छताबाबत जायका कंपनीच्या माध्यमातून प्रकल्प राबविण्यात येणार आहे. महापालिकेने राबविलेल्या निविदा प्रक्रियेस जायका कंपनीने मान्यता दिली आहे. त्यामुळे संबंधित या निविदा स्थायी समितीत मंजूर करून त्याचे भूमिपूजन करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. अशी माहिती मुरलीधर मोहळ (Muralidhar Mohal)यांनी दिली आहे. मुळा व मुठा या शहरातील दोन नद्याच्या संर्वधनासाठी हा प्रकल्प कार्यरत असणार आहे.
या प्रकल्पाच्या माध्यमातून शहराच्या नदीकाठावर 11 सांडपाणी शुध्दीकरण प्रकल्प उभारले जाणार आहेत. याद्वारे शहरात निर्माण होणारे सांडपाणी 100 टक्के शुद्ध करून नदीत सोडले जाणार आहे. त्यामुळे, नदी प्रदूषण पूर्ण रोखण्यासाठी हा प्रकल्प महत्वाचा ठरणार आहे. दरम्यान, 2015 मध्ये केंद्रशासनाने या प्रकल्पास मान्यता दिली होती.या प्रकल्पावर सुमारे १५०० कोटीचा खर्च केला जाणार आहे.
या प्रकल्पासाठी सल्लागार नेमणे तसेच या प्रकलपासाठी काढण्यात आलेल्या पहिल्या निविदा जवळपास दुप्पट दराने आल्याने हा प्रकल्प वादग्रस्त ठरला होता. त्यानंतर नव्याने सर्व प्रक्रिया करण्यात आल्याने हा प्रकल्प सुमारे 6 वर्षे रखडला होता. मात्र, अखेर तो मार्गी लागला असून समितीच्या मान्यता मिळाल्यानंतर मार्च महिन्याच्या पहिल्या आठवड्यात त्याचे भूमिपूजन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उदघाटन केले जाणार आहे.
VIDEO | हळदीला मित्रांचा आग्रह, नवरदेवाचा तलवारींसोबत डान्स, पोलीस येताच लग्नाच्या मुहूर्तावरच फरार
‘अतिशहाणा त्याचा…’ ‘हे’ महाशय असं काही करायला गेले अन् धपकन् आपटले, Viral video पाहा
‘कसौटी’च्या अनुरागला 44 व्या वर्षीं ‘प्रेरणा’ सापडली, सिजेन खानचं बिर्याणीवालं प्रपोज कसं ठरलं हिट?