दाभोलकरांच्या हत्येला 8 वर्षे, मात्र मुख्य सूत्रधारांना शोधण्यात अपयश, अंनिसकडून ठिकठिकाणी निदर्शनं
महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिचीचे संस्थापक डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येला 8 वर्षे उलटले आहेत. त्यानंतरही मुख्य सूत्रधारांचा शोध लागलेला नाही. त्याविरोधात पुण्यासह राज्यभरात विविध ठिकाणी अंनिसच्या कार्यकर्त्यांनी आंदोलन केलं.
1 / 12
महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिचीचे संस्थापक डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येला 8 वर्षे उलटले आहेत. त्यानंतरही मुख्य सूत्रधारांचा शोध लागलेला नाही. त्याविरोधात पुण्यासह राज्यभरात विविध ठिकाणी अंनिसच्या कार्यकर्त्यांनी आंदोलन केलं.
2 / 12
आज (20 ऑगस्ट) डॉ. दाभोलकरांच्या स्मृतीदिनानिमित्त अंनिसच्या कार्यकर्त्यांनी ठिकठिकाणी जमून दाभोलकरांना आदरांजली वाहिली. पुण्यात ज्या ठिकाणी हत्या झाली त्या विठ्ठल रामजी शिंदे पुलावर येऊन 8 व्या स्मृतीदिना निमित्ताने आदरांजली वाहण्यात आली.
3 / 12
दाभोलकर यांच्यावर 20 ऑगस्ट 2013 रोजी मॉर्निंग वॉकच्या वेळी अज्ञातांनी गोळ्या झाडून त्यांची हत्या केली होती. त्यानंतर बराच काळ मारेकऱ्यांचा शोध लागला नाही.
4 / 12
अखेर या प्रकरणी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली. उच्च न्यायालयाने आपल्या देखरेखीखाली या प्रकरणाचा तपास करण्याचे आदेश दिले. यानंतर संशयित आरोपींना अटक झाली.
5 / 12
मात्र, 8 वर्षे उलटूनही या प्रकरणाचा खटला न्यायालयात उभा राहिलेला नाही. त्यामुळे तात्काळ हा खटला सुरू करुन आरोपींना शिक्षा करण्याची मागणी अंनिसकडून केली जात आहे.
6 / 12
दाभोलकरांच्या हत्येनंतर अंनिसचे कार्यकर्ते दरवर्षी राज्यभरात ठिकठिकाणी आदरांजली वाहत गुन्हेगारांना अटक करुन शिक्षा देण्याची मागणी करतात.
7 / 12
यंदाही ही मागणी केली जातेय. आज अनेक कार्यकर्ते हातावर काळ्या पट्टया बांधून आदरांजली वाहण्यासाठी वेगवेगळे फलक घेऊन रस्त्यावर उतरलेले पाहायला मिळाले.
8 / 12
कोल्हापूर जिल्ह्यातील इचलकरंजी येथे देखील अंनिसच्या कार्यकर्त्यांनी फलक घेऊन दाभोलकर, पानसरे आणि कलबुर्गी यांच्या मारेकऱ्यांना शिक्षेची मागणी केली.
9 / 12
यावेळी अंनिसच्या कार्यकर्त्यांनी प्रशासकीय अधिकाऱ्यांना निवेदन देत आपल्या मागण्या पोहचवल्या.
10 / 12
घाटकोपरमध्ये देखील अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या लहान मोठ्या कार्यकर्त्यांनी हातात बॅनर घेऊन मारेकऱ्यांना शिङेची मागणी केली.
11 / 12
एकूणच राज्यभरात अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या वतीने दाभोलकरांना आदरांजली वाहताना गुन्हेगारांना शिक्षा देण्याची जोरकस मागणी करण्यात आलीय.
12 / 12
अंनिसचे राज्यभरातील ठिकठिकाणचे आंदोलन-मोर्चे.