पुणे: पुणे- सातारा महामार्गावर हरिश्चंद्री गावाजवळ कंटेनर उलटल्याने अपघात (Accident) झालायं. तीव्र उतार आणि पाऊस यामुळे रस्त्याचा अंदाज न आल्यान चालकाचे कंटेनरवरचे नियंत्रण (Control) सुटल्याने हा अपघात झालाय. सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झालेली नाही. चालक मात्र यात जखमी झालायं. सद्दाम शेख असं जखमी झालेल्या चालकाचं नाव आहे. कंटेनर पुण्याहून (Pune) साताऱ्याच्या दिशेने जात असताना सकाळी नऊच्या सुमारास हा अपघात झालायं. अपघातानंतर या मार्गावरची वाहतूक काही काळ विस्कळीत झाली होती.
गेल्या 10 दिवसातला हा 3 तिसरा अपघात घडलायं. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण अधिकारी, रिलायंसचे अधिकारी आणि ठेकेदार जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्याचा स्थानिकांनी आरोप केलायं. सातारा महामार्गावर हरिश्चंद्री गावाजवळ कंटेनर उलटल्यानं अपघात झाला. तीव्र उतार आणि पाऊस यामुळे रस्त्याचा अंदाज न आल्यान चालकाचे कंटेनरवर वरचे नियंत्रण सुटल्यानं हा अपघात झालाय. UP 14 HT 2644 हा कंटेनर पुण्याहून साताऱ्याच्या दिशेने निघाला होता.
सकाळी साडेआठ-नऊ सुमारास हरिश्चंद्री गावाजवळ आल्यावर पाऊस आणि तीव्र उतार यामुळं चालकाचे कंटेनरवरचे नियंत्रण सुटलं आणि कंटेनरवर पलटी झाला. यात मुळचा उत्तर प्रदेशचा असणारा कंटेनरवर चालक सद्दाम शेख जखमी झालाय. अपघात होताच स्थानिकांनी घटनास्थळी धाव घेऊन मदतकार्य केल आणि जखमी चालकाला जवळच्या रुग्णालयात उपचारासाठी पाठवलं.सध्या या ठिकाणी वारंवार अपघात घडतायंत.
पुणे- सातारा महामार्गाचे काम अपूर्ण असून हरिश्चंद्री ग्रामस्थांनी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण अधिकारी यांच्याकडे वेळोवेळी अपूर्ण कामाविषयी चर्चा केली. ग्रामस्थांना रहदारीस अडथळा होऊ नये यासाठी भुयारी मार्ग ब्रिज, दोन्ही बाजुला सर्व्हिस रोडवरील गटारांची व्यवस्था करणे, रस्त्यालगतची अतिक्रमणे काढून त्याठिकाणी पादचारी मार्गाची व्यवस्था करणे, सर्व्हिस रोड चालू करणे आणि दिशादर्शक फलक उभारण्याची मागणी केली. अपूर्ण कामे तातडीने पूर्ण करावीत, अन्यथा लवकरच तीव्र आंदोलन करण्याचा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे.