पुणे | 9 सप्टेंबर 2023 : पुणे शहरात गोकुळ अष्टमी आणि दहीहंडी उत्सव जोरात झाला. हजारो लोकांचा गर्दीसमोर “मच गया शोर सारी नगरी रे” गाण्यावर नृत्य करत गोविंदांच्या पथकांनी दहीहंडी फोडली. मुंबईप्रमाणे पुणे शहरातील दहीहंडी उत्सव पाहण्यासाठी जनसागर लोटला होता. यावेळी बॉलीवूड चित्रपटातील कलाकारही आले होते. हिंदी चित्रपटातील प्रसिद्ध अभिनेत्री आली. तिने चाहत्यांची मागणी पूर्ण करत सर्वांची मने जिंकली. तिने प्रचंड गर्दीसमोर म्हटलेले शिवतांडव नृत्याचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे.
काही दिवसांपूर्वी द केरल स्टोरी चित्रपट रिलिज झाला होता. या चित्रपटाला प्रेक्षकांनी मोठा प्रतिसाद दिला. या चित्रपटातील कलाकारांनी लोकांची मने जिंकली होती. या चित्रपटामुळे अभिनेत्री अदाह शर्मा प्रसिद्ध झाली. पुण्यातील दहीहंडी उत्सवानिमित्त ती आली होती. दहीहंडी उत्सव आणि तिला पाहण्यासाठी प्रचंड गर्दी झाली. या गर्दीचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. अदाहने हा व्हिडिओ तिच्या अकाउंटवर टाकला आहे.
प्रचंड गर्दीतून अदाह शर्मा हिला शिव तांडव म्हणण्याची मागणी केली. तिने लगेच होकार देत शिव तांडव म्हटले. यामुळे गर्दीचा उत्साह अधिकच वाढला. अदाह शर्मा हिने यासंदर्भातील एक व्हिडिओ टाकला ज्यामध्ये ती कार्यक्रमात पोहोचते. त्यानंतर ती मराठीत उपस्थितांचे स्वागत करते. व्हिडिओमध्ये तिचे वेगळे लूक दिसत आहे. यावेळी ‘द केरळ स्टोरी’ मध्ये भूमिका साकारणारी अदाह शर्माने हे देखील उघड केले की, तिला एका दिवसात तीन वेळा तिचा पोशाख बदलावा लागतो.