पुणे | 7 ऑगस्ट 2023 : पुणे आणि मुंबईतील प्रवाशांसाठी ओला कंपनीने नवीन घोषणा केली आहे. ओलाची प्राईम प्लस बंगळुरुमध्ये यशस्वी झाल्यानंतर आता महाराष्ट्रात सुरु होत आहे. 28 मे रोजी या सेवेची घोषणा करण्यात आली होती. त्याच दिवशी बंगळुरूमधील निवडक प्रवाशांसाठी ही सेवा सुरु झाली. राज्याची आर्थिक राजधानी मुंबई आणि सांस्कृतिक राजधानी पुणे शहरात ही सेवा सुरु झाली आहे. मुंबई, पुण्याबरोबर ही सेवा हैद्राबादमध्ये मिळणार आहे. यामुळे देशातील चार शहरांमध्ये प्राईम प्लस सेवा सुरु केली आहे. प्राईप पल्समध्ये प्रवाशांना अखंड प्रवासाची हमी, व्यावसायिक ड्रायव्हर्स अन् इतर अनेक फायदे दिले आहे. यामुळे बुक केलेली ट्रिप चालकाला रद्द करता येणार नाही.
ओलाने आपल्या प्राइम प्लस सेवेसाठी किंमती कशा ठरवेल? याबद्दल काहीच माहिती उघड झाली नाही. परंतु काही दिवसांपूर्वी कंपनीचे सीईओ भाविश अग्रवाल बंगळुरुमध्ये किंमत जाहीर केली. त्यानुसार बंगळुरुमध्ये एका तासाचा प्रवास आणि 16 किलोमीटर अंतरासाठी 455 रुपये आकारले जात आहेत. मिनी कॅब या पर्यायातून राईड बुक केल्यावर त्याची किंमत 535 रुपये असणार आहे.
कंपनीच्या वेबसाइटवर दिलेल्या माहितीनुसार, इलेक्ट्रिक स्कूटरची टॉप किंवा सर्टिफाईड रेंज 125 किलोमीटरची आहे. एकवेळा चार्ज केल्यानंतर या गाड्या 125 किलोमीटरचे अंतर पूर्ण करतात. तसेच 85 किलोमीटर प्रतितासाच्या वेगाने धावतात. या गाड्या सहा रंगात उपबल्ध आहे. या स्कुटरचे तीन हजार युनिटची आतापर्यंत विक्री झाली आहे, असे कंपनीचे सीईओ भाविश अग्रवाल यांनी म्हटले आहे.