पुणे परिसरातील धरणांमध्ये का होतेय प्रदूषण, अजित पवार यांनी रोखठोकपणे दिले कारण

| Updated on: Mar 21, 2023 | 3:51 PM

राज्यात सर्वाधिक धरणे पुणे जिल्ह्यात आहेत. मुंबईपेक्षा पुणे शहरातील वातावरण चांगले आहे. त्याचा फायदा घेत अनेक नागरिक धरण परिसरात सेकंड होम करत आहे. तसेच काही व्यावसायिक रिसॉर्ट उभारले जात आहेत. या प्रकल्पांमधून प्रक्रिया न केलेले सांडपाणी धरणात सोडण्यात येत आहे.

पुणे परिसरातील धरणांमध्ये का होतेय प्रदूषण, अजित पवार यांनी रोखठोकपणे दिले कारण
Follow us on

पुणे : पुणे शहर वाढत आहे. पुणे शहराचा विस्तार चौहूबाजूंनी होत आहे. त्यामुळे पुणे शहरावर पायाभूत सुविधा उभारण्याचे आव्हान उभे राहिले आहे. नागरिकांच्या गरजा भागवण्यासाठी पुणे शहरातील बांधकाम प्रकल्प वाढत आहे. तसेच सेंकड होम म्हणून मुंबईतील अनेक जण पुणे शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांजवळ बांधकाम करत आहेत. यामुळे पुणे शहरासह परिसराला पाणी पुरवठा करणाऱ्या धरणांच्या परिसरात गेल्या काही वर्षात बांधकामांचे प्रमाण वाढले आहे. यामध्ये रहिवासी प्रकल्पांसह काही कमर्शिअल प्रकल्पसुध्दा कार्यान्वित झाले आहेत. त्याचा परिणामी धरणांमधील प्रदूषण वाढले असल्याचे विधानसभेतील विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी सांगितले.

अजित पवार यांनी विधानसभेत पुणे शहराला व जिल्ह्याला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांचा विषय मांडला. या प्रकल्पातून प्रकिया न केलेले सांडपाणी सोडण्यात येते. या सांडपाण्यामुळे धरणांतील पाणी प्रदूषित होते, धरणातील पाण्याचे प्रदूषण रोखण्यासाठी सरकारने ताताडीने ठोस कार्यक्रम राबविण्याची मागणी विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी केली.

सर्वाधिक धरणे पुण्यात

हे सुद्धा वाचा


राज्यात सर्वाधिक धरणे पुणे जिल्ह्यात आहेत. जिल्ह्यातील या धरण परिसरात अनेक लोक सेकंड होम तसेच रिसॉर्ट उभारत आहेत. गेल्या काही दिवसांत अशा प्रकल्पांचे प्रमाण वाढत आहे. या प्रकल्पांमधून प्रक्रिया न केलेले सांडपाणी सोडण्यात येते. हे सांडपाणी पुणे शहरासह परिसराला पाणीपुरवठा करणाऱ्या खडकवासला, पवना, टेमघर, वरसगाव, पानशेत, चासकमान, भामा-आसखेड या धरणातील पाण्यात मिसळून पाण्याचे मोठ्या प्रमाणात प्रदूषण होत आहे.

धरणातील पाण्याचे प्रदूषण रोखण्यासाठी जलसंपदा, नगरविकास, ग्रामविकाससह संबंधित खात्यांचा समन्वय करत राज्य शासनाने तातडीने ठोस कार्यक्रम राबविण्याची मागणी विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी केली.

उजनीचा प्रश्न गंभीर


उजनी जलाशयाच्या प्रदूषणात मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. यामुळे धरणाच्या आश्रयाला लाखोंच्या संख्येने लेल्या स्थलांतरित व स्थानिक पक्ष्यांचा अधिवास धोक्यात आला आहे. धरणातील पाण्याच्या प्रदूषणाची पातळी वाढल्याने पाण्याचा रंग हिरवा गर्द झाला आहे. जलाशयाच्या पाण्याला उग्र वास येत आहे. धरणाच्या पाण्यात वावर करत असलेले मच्छीमार आणि शेतकरी या पाण्यामुळे अंगाला खाज येत असल्याची तक्रार करीत आहेत.