पुणे : सर्वसामान्य व्यक्ती उद्योगात यशस्वी होऊ शकतो. त्यासाठी हवी जिद्द, मेहनत करण्याची तयारी अन् गलेलठ्ठ पगाराची नोकरी सोडण्याचे धाडस. मुळची पुणेकर असलेल्या युवतीने हेच केले. मग पाहता, पाहता यशाचे शिखर तिने गाठले. अन् 75 हजार कोटींचे साम्राज्य उभे केले. तिची स्वत:ची संपत्ती चार हजार कोटींपेक्षाही जास्त आहे. नेहा नारखेडे या मराठमोळ्या मुलीची यशोगाथा कोणाला अचंबित करणार आहे. नेहा नारखेडा हिला अनेक सन्मानसुद्धा मिळाले आहे.
नेहा नारखेडे ही मुळची पुणेकर. तिचे शालेय शिक्षण पुणे शहरात झाले. पुणे विद्यापीठातून पदवी घेतली. २००६ मध्ये जार्जिया विद्यापीठातून संगणक शास्त्राची पदव्युत्तर पदवी घेण्यासाठी तिने अमेरिका गाठले. पदवी घेताच तिला स्वप्नवत नोकरी मिळाली. जगप्रसिद्ध ओरॅकल कंपनीत ती सॉफ्टवेअर इंजिनिअर म्हणून रुजू झाली. तिने लिंकेडीन कंपनीत काम केले. परंतु गलेलठ्ठ पगाराची ही नोकरी तिला स्वस्थ बसू देत नव्हती. मग नोकरी सोडण्याचे धाडस तिने केले.
२०१४ मध्ये लिंकेडीनमधील दोन सहकाऱ्यांसोबत घेऊन तिने स्वत:ची कंपनी सुरु केली. तिचे हे धाडस चांगलेच यशस्वी झाले. २०२१ मध्ये ती पब्लिक कंपनी झाली. या कंपनीचे मूल्य ७५ हजार कोटी (जवळपास ९.१ बिलियन डॉलर) होते. आता ती अजून सहा कंपन्यांची मालक आहे. तिची स्वत:ची संपत्ती 4 हजार 296 कोटी रुपये आहे. २०२१ मध्ये ऑसिलर या कंपनीसुद्धा ती चालवते. तिच्यात १६० कोटींची गुंतवणूक तिने केली आहे.
हुरुन इंडियाने केलेल्या श्रीमंताच्या यादीत नेहा नारखेडे हिला स्थान मिळाले. सर्वात कमी वयाची महिला म्हणून ती त्या यादीत होती. ‘फोर्ब्स’ मासिकाने सर्वात कमी वयाची प्रतिभाशाली उद्योजक म्हणून तिची निवड केली आहे. नेहा नारखेडे आज अनेक कंपन्याची सल्लागार म्हणूनही काम करत आहे.
एनआयओ कंपनीचे मुख्य कार्यकारी पद्माश्री वारियर, भारतातील पहिली महिला आयपीएस अधिकारी किरण बेदी आणि पेप्सीकोची मुख्य कार्यकारी अधिकारी इंदिरा नुई तिचे प्रेरणास्थान आहे.