Loksabha Election 2024 | अजित पवार यांच्या नाराजीच्या चर्चेवर संजय काकडे यांची पहिली प्रतिक्रिया काय?

| Updated on: Mar 07, 2024 | 12:12 PM

Loksabha Election | "विरोधी पक्षाच पण हे काम असू शकतं. ज्यांची निवडून येण्याची क्षमता आहे, त्यांना उमेदवारी दिली जाईल. उमेदवारी मिळेपर्यंत चढा-ओढ असते. उमेदवारी जाहीर झाल्यावर भाजप ठामपणे उभी असते" असं संजय काकडे म्हणाले.

Loksabha Election 2024 | अजित पवार यांच्या नाराजीच्या चर्चेवर संजय काकडे यांची पहिली प्रतिक्रिया काय?
ajit pawar
Follow us on

पुणे (प्रदीप कापसे) : पुणे भाजपामधील अंतर्गत धुसफूस चव्हाट्यावर आली आहे. मुरलीधर मोहोळ यांच्याविरोधात महापालिकेच्या जवळ बॅनरबाजी करण्यात आली. त्यावर माजी खासदार आणि भाजपा नेते संजय काकडे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. “भाजपात अशा छोटा-मोठया गोष्टी होत राहतात. अशा बॅनरला पक्ष भीक घालणार नाही. छोटा कार्यकर्ता भावनेच्याभरात बॅनर लावतो. मेरिटप्रमाणे पक्ष सर्व्हे केला आहे. काही नावं पण दिल्लीत गेली आहेत. पक्ष कोणावर अन्याय करत नाही. पक्षाने मेधा कुलकर्णी यांना सर्वोच्च सभागृहात स्थान दिलं काही नेत्यांचे काही असंतुष्ट कार्यकर्ते असतात ते अशा गोष्टी करत असतात” असं संजय काकडे म्हणाले.

“असे बॅनर पाहून, मला वाटतं नाही की भाजपच्या कार्यकर्त्यांनी लावले असतील. भाजपची कोअर कमिटी निर्णय घेईल. असे बॅनर पाहून मुरलीधर मोहोळ यांचं तिकिट कापलं जाणार नाही किंवा त्यांनाच मिळेल हे मी आताच सांगू शकत नाही” असं संजय काकडे म्हणाले. “विरोधी पक्षाच पण हे काम असू शकतं. ज्यांची निवडून येण्याची क्षमता आहे, त्यांना उमेदवारी दिली जाईल. उमेदवारी मिळेपर्यंत चढा-ओढ असते. उमेदवारी जाहीर झाल्यावर भाजप ठामपणे उभी असते. 15 तारखेनंतर राज्यातील भाजपची यादी जाहीर होईल” असं संजय काकडे म्हणाले.

‘अजित पवारांकडे एकच खासदार’

अजित पवार यांच्या नाराजीच्या चर्चांबद्दलही ते बोलले. “अजित पवार नाराजीतून अमित शहा यांना भेटायला चालेल आहेत, असं कुठे म्हटलं आहे का?. अजित पवारांकडे एकच खासदार आहे, सुनील तटकरे आहेत. तरीही, त्यांना चांगल्या जागा मिळतील. अजित दादांना युती झाली, तर चांगल्या जागा मिळतील. भाजपच्या कोणत्याच नेत्यांनी असं सांगितलं नाही की, एवढ्या जागा मिळतील. मात्र एकनाथ शिंदे आणि अजित पवार समाधानी होतील” असा विश्वास संजय काकडे यांनी व्यक्त केला.