पुणे शहरातील रिक्षाचालक का आला चर्चेत? काय आहे त्याच्या रिक्षेत?

| Updated on: Apr 15, 2023 | 9:55 AM

पुणे शहरातील रिक्षाचालकाने एक नवीन कल्पना आणली आहे. प्रशांत कांबळे असे या रिक्षाचालकाचे नाव आहे. त्यांना वाचनाची आवड आहे. यामुळे त्यांनी सुरुवातीला काही पुस्तके त्याच्या ऑटो-रिक्षात ठेवली. मग या कल्पनेला प्रतिसाद मिळू लागला.

पुणे शहरातील रिक्षाचालक का आला चर्चेत? काय आहे त्याच्या रिक्षेत?
pune auto
Follow us on

पुणे : पुणेकर व्यक्ती जे ही करतो ते वेगळे असते. त्यांच्या या वेगळेपणाची चर्चा होत असते. मग पुणेरी पाट्यांपासून पुणेरी जोक्सपर्यंत. पुणे शहरातील शिक्षणापासून पुणे आयटी हबपर्यंत…सर्वच वेगळे असते. पुणे शहरातील वेगळपण जपणारा एक रिक्षाचालक सध्या चर्चेत आला आहे. त्यांनी पुण्याच्या संस्कृतीला अनुसरुन आपल्या रिक्षेत बदल केला आहे. यामुळे रिक्षेत बसणाऱ्या प्रवाश्याचा वेळ चांगल्या पद्धतीने जातो. तसेच प्रवाशांना ज्ञानही मिळते. या रिक्षाचालकाचे नाव आहे प्रशांत कांबळे. त्याच्या या उपक्रमाचे चांगले कौतूक होत आहे.

काय केले प्रशांत कांबळे यांनी

हे सुद्धा वाचा


प्रशांत कांबळे यांनी त्यांच्या रिक्षेत एक मिनी लायब्ररी तयार केली आहे. वाहतूक कोंडीत अडकलेल्या पुणेकरांचा वेळेचा चांगला उपयोग यामुळे होत आहे. त्यांनी त्यांच्या रिक्षेमध्ये अनेक प्रकारची पुस्तके ठेवली आहे. प्रशांत कांबळे यांनी त्यांच्या ऑटोरिक्षात उभारलेल्या वाचणालयाच्या प्रयत्नांचे कौतुक होत आहे.

कशी सूचली कल्पना


प्रशांत कांबळे यांना वाचनाची आवड आहे. यामुळे त्यांनी सुरुवातीला काही पुस्तके त्याच्या ऑटो-रिक्षात ठेवली. हळूहळू त्यांच्या लक्षात आले की, काही प्रवाशांनाही पुस्तके वाचण्याची आवड आहे. मग एके दिवशी कांबळे, प्रियांका चौधरीला भेटले. प्रियंका चौधरी ओपन लायब्ररी उपक्रमासाठी काम करतात. मग प्रियांक यांनी प्रशांत कांबळे यांना त्यांच्या ऑटो-रिक्षात एक छोटी लायब्ररी उभारण्याचा सल्ला दिला. या ग्रंथालयासाठी त्यांनी पुस्तके देण्याचे आश्वासन दिले.

तीन वर्षांपासून सुरु आहे प्रकल्प


कांबळे हे गेल्या तीन वर्षांपासून त्यांच्या ऑटोरिक्षात फिरते वाचनालय चालवत आहेत. प्रवासात त्यांच्या वाचनालयाचा हजारो लोकांनी लाभ घेतला आहे. काही प्रवाशांनी त्यांना मोफत पुस्तक दिली आहेत. प्रशांत कांबळे म्हणतात की, “माझ्या रिक्षातून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना मोबाईल लायब्ररीची कल्पना आवडली आहे. त्यांच्यापैकी अनेकांना ऑटो-रिक्षा भाड्याने घ्यायची असल्यास मला फोन करतात. त्याला प्रवासात पुस्तके वाचायला आवडतात.”

फक्त मराठी पुस्तके

प्रियांका चौधरी म्हणाल्या की, “मराठी भाषा सर्वसामान्यांमध्ये लोकप्रिय करण्याचा आमचा प्रयत्न आहे. आमच्या खुल्या वाचनालयाच्या सहाय्याने आम्ही लोकांना मराठीतील पुस्तके उपलब्ध करून देत आहोत. प्रशांत कांबळे यांच्या ऑटोरिक्षात विविध प्रकारची पुस्तके उपलब्ध आहेत”

हे ही वाचा
पुण्याची महिला मोटारसायकलवर साडी परिधान करुन निघाली वर्ल्ड टूरला, एक लाख किमी प्रवास करणार

विचित्र योगायोग | पुणे शहरातील तापमान वाढणार अन् पाऊस येणार