Pune News : स्वप्नातील घर घेण्यासाठी पुणे शहराला पसंती, सहा महिन्यांत किती घरांची झाली विक्री

| Updated on: Sep 04, 2023 | 12:26 PM

Pune News : देशात गेल्या तीन महिन्यांत सर्वाधिक घरांची विक्री पुणे शहरात झाली आहे. मुंबईपेक्षाही पुण्यात घर खरेदी करणाऱ्यांची संख्या जास्त आहे. कोणत्या कारणांमुळे पुण्यात घर खरेदी करण्यास सर्वसामान्य लोकांनी प्राधान्य दिले आहे.

Pune News : स्वप्नातील घर घेण्यासाठी पुणे शहराला पसंती, सहा महिन्यांत किती घरांची झाली विक्री
Follow us on

पुणे | 4 सप्टेंबर 2023 : पुणे शहर शिक्षण आणि औद्योगिक द्दष्या प्रगत झालेले शहर आहे. पुण्याला सांस्कृतिक राजधानी म्हटले जाते. पुणे शहरात शिक्षणासाठी अनेक अभ्यासक्रम आहेत. रोजगाराच्या अनेक संधी पुणे शहरात आहे. माहिती आणि तंत्रज्ञानाचे शहर म्हणून पुण्याची ओळख झाली आहे. यामुळे पुणे शहरात येणाऱ्या लोकांची संख्या वाढली आहे. आता सीआरई मॅट्रीक्सचा सहामाही अहवाल आला आहे. त्यानुसार सर्वाधिक घरांची खरेदी पुणे शहरात झाली आहे.

पुणे शहरात किती घरांची झाली विक्री

पुणे शहरात घरांची विक्री वाढली असल्याचा सीआरई मॅट्रीक्सने दिलेल्या अहवालात म्हटले आहे. देशभरातील शहरांमधील विक्रीची माहिती त्यात दिली आहे. त्यानुसार सर्वाधिक विक्री पुणे शहरात झाली आहे. जानेवारी ते जून या सहा महिन्यात पुणे शहरात 45 हजार घरांची विक्री झाली आहे. त्यानंतर क्रमांक हैदराबाद आणि बेंगळुरुचा आहे. या शहरांमध्ये अनुक्रमे 38 आणि 40 हजार घरांची विक्री झाली आहे. देशाची आर्थिक राजधानी मुंबईत घर घेणे महाग आहे. मुंबईत 22 हजार घरांची विक्री सहा महिन्यांत झाली आहे. त्यानंतर दिल्लीचा क्रमांक आहे. दिल्लीत 21 हजार घरे विकली गेली आहेत.

पुणे शहराला का आहे पसंती

मुंबई शहरांपासून तीन तासांच्या अंतरावर पुणे शहर आहे. पुणे शहरात दळणवळाच्या चांगल्या सुविधा आहेत. पुणे शहरात शिक्षणाच्या अनेक संधी आहेत. रोजगार सहज उपलब्ध होतो. माहिती आणि तंत्रज्ञान क्षेत्रातील अनेक कंपन्या पुण्यात आहेत. या क्षेत्रातील तरुण पुण्यात घर घेण्यास प्राधान्य देत आहे. निवृत्तीनंतर पुण्यात राहण्याचा निर्णय अनेक जण घेतात. पुणे शहरातील वातावरण चांगले आहे. यामुळे पुणे शहरात घरांची विक्री वाढली आहे.

हे सुद्धा वाचा

काय म्हणतात तज्ज्ञ

शाद ग्रुप ऑफ कंपनीचे सीईओ उस्मान इस्लाम कुरैशी यांनी म्हटले की, मुंबईत जागांची कमतरता आहे. पायाभूत सुविधा निर्माण करण्यास मर्यादा आहे. प्रदूषण आणि वाढती वाहतुकीचा प्रश्न आहे. परंतु पुणे शहरात अनेक चांगल्या सुविधा आहेत. पुणे शहरात स्वस्तात घर मिळते. यामुळे अनेकांनी मुंबईपेक्षा पुण्यात प्राधान्य दिले पाहिजे.