पुणे तेथे काय उणे, या सर्व्हेक्षणात ४० शहरांना मागे टाकून पुणे नंबर वन

| Updated on: Apr 30, 2023 | 11:41 AM

Pune News : पुणे शहराची वाढ वेगाने होत आहे. उद्योगापासून आयटीपर्यंत विविध क्षेत्राचा विस्तार पुण्यात झाला आहे. सर्वाधिक चांगले वातावरण आणि शिक्षण पुण्यात आहे. आता एका सर्व्हेक्षणात पुणे शहराने बाजी मारली आहे.

पुणे तेथे काय उणे, या सर्व्हेक्षणात ४० शहरांना मागे टाकून पुणे नंबर वन
Pune
Follow us on

पुणे : पुणे शहराचे आकर्षण राज्यातील नाही तर देशभरातील लोकांना आहे. पुणे शहरातील चांगले वातावरण आणि शिक्षणामुळे अनेक जण या ठिकाणी आपली मुक्काम ठोकतात. विविध उद्योग पुणे शहरात असल्यामुळे रोजगार निर्मिती मोठ्या प्रमाणावर आहेत. आता ओला मोबिलिटी इन्स्टिट्यूटने पुणे-पिंपरी चिंचवडचा गौरव केला आहे. देशातील 40 प्रमुख शहरांच्या यादीत हे शहर पहिल्या क्रमांकावर आहे तर मुंबई दुसऱ्या क्रमांकावर आहे. सर्वसामान्यांना परवडणारी ही शहरे असल्याचे त्यात म्हटले आहे.

कोणी केले सर्व्हेक्षण

अहवाल 2022 नुसार, पुण्यामध्ये देशात सर्वाधिक चांगली मोबिलिटी सिस्टम आहे. महाराष्ट्रातील पुणे आणि पिंपरी-चिंचवड 40 प्रमुख शहरांच्या यादीत अव्वल स्थानावर आहे. यानंतर मुंबई आणि कोईम्बतूरचा क्रमांक लागतो. मग हैदराबाद, बंगळुरू आणि इंदूरचा क्रमांक आहे. ओला मोबिलिटी इन्स्टिट्यूट (ओएमआय) ने प्रसिद्ध केलेल्या इज ऑफ मूव्हिंग इंडेक्स (EOMI) मध्ये पुण्याला प्रथम स्थान दिले आहे.

हे सुद्धा वाचा

कोण करतो सर्वात कमी खर्च

जबलपूरमधील नागरिक मोबिलिटीवर सर्वात कमी खर्च करतात. आगरतळा येथे पादचाऱ्यांसाठी उत्कृष्ट पायाभूत सुविधा आहे. कोलकाता आणि दिल्लीत भारतातील सर्वात वाईट फूटपाथ असल्याचे अहवालात म्हटले आहे. या सर्व्हेसाठी ज्या ४० शहरांची निवड केली त्यात देशातील २५ टक्के लोकसंख्या राहते. या शहरांमध्ये नवी दिल्ली, कोलकाता, हैदराबाद, चेन्नई, बंगळुरु, अहमदाबाद, सुरत यासारख्या शहरांचा समावेश आहे.

काय आहेत वैशिष्ट्ये

  • दरमहा वाहतुकीवर सर्वात कमी खर्च करणाऱ्यांमध्ये मुंबईकरांचा समावेश आहे
  • कोलकातामध्ये शेअर मोबालिटी सर्वाधिक स्वीकारली गेली आहे
  • अहमदाबादमध्ये इलेक्ट्रिक वाहनांचा सर्वाधिक वापर आहे
  • चेन्नईमध्ये भारतातील सर्वोत्तम सायकलिंग पायाभूत सुविधा आहेत

कसा केला सर्व्हे

ओएमआय फाउंडेशन ही एक सोशल इनोवेशन आणि पॉलिसी रिसर्च थिंक टँक संस्था आहे. त्याचा इज ऑफ मूव्हिंग इंडेक्स अहवाल 2022 आता प्रसिद्ध झाला. देशातील 40 शहरांमधील नागरी मोबिलिटीवर केलेले हे सर्वेक्षण आहे. ज्यामध्ये 41 निर्देशकांचा समावेश आहे. यामध्ये 50,000 हून अधिक लोकांनी प्रतिसाद दिला. यामध्ये पुणे शहराने बाजी मारली आहे.