Pune School food poisoning: पिंपरी चिंचवड शहरातील शाहूनगरच्या डी. वाय. पाटील स्कूलमध्ये विद्यार्थ्यांना विषबाधा झाली आहे. विषबाधा झाल्यामुळे शाळेतील विद्यार्थी चक्कर येऊ लागले. त्यानंतर ते खाली पडले. विद्यार्थ्यांची ही अवस्था पालक वर्गही हादरला. विद्यार्थ्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. दरम्यान, विद्यार्थ्यांना निष्कृष्ट अन्न खाऊ घालणाऱ्या शाळेच्या प्रशासनावर कारवाई करण्याची मागणी पालकांनी केली आहे.
पिंपरी चिंचवडमधील शाहू नगरच्या डी वाय पाटील स्कूलमध्ये गुरुवारी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमामध्ये विद्यार्थ्यांना सँडविच खाण्यासाठी देण्यात आले. निकृष्ट दर्जाचे सँडविच दिल्यामुळे त्यातून विद्यार्थ्यांना विषबाधा झाली असल्याचा आरोप पालकांनी केला आहे. स्कूल प्रशासन आणि पालकांनी काही विद्यार्थ्यांना उपचारासाठी खाजगी रुग्णालयात दाखल केले आहे.
दरम्यान, या घटनेबाबत डी वाय पाटील स्कूलच्या प्रशासनाची भूमिकाही समोर आली आहे. सकाळी विद्यार्थ्यांना ब्रेड आणि चटणी खायला देण्यात आली होती. त्याच ब्रेड आणि चटणीतून 350 विद्यार्थ्यांना विषबाधा झाली असल्याचे प्रशासनाने म्हटले आहे. या प्रकाराबद्दल डी वाय पाटील स्कूलच्या प्रशासनाने दिलगिरी व्यक्त केली आहे.
शाळेतील विद्यार्थ्यांनी सॅडविट खाल्ले. त्यानंतर विद्यार्थ्यांना उलटी, मळमळ लागली. अनेक विद्यार्थ्यांना भोवळ येऊ लागली. विद्यार्थ्यांना विषबाधा झाल्याचे लक्षात आले. त्यांना तातडीने रुग्णालयात पाठवण्यात आले. दरम्यान, या प्रकारामुळे पालक संतप्त झाले आहे. विद्यार्थ्यांना निकृष्ट अन्न खाऊ घालणाऱ्या दोषींवर कडक कायदेशीर कारवाई करण्याची मागणी केली. स्कूल प्रशासनाकडून कठोर कारवाई करण्याचे आश्वासन पालकांना दिले.
दरम्यान मुलांना उलटी, मळमळ होत असताना काही विद्यार्थ्यांना सरळ घरी पाठवण्यात आल्याचा आरोप पालकांनी केला. अनेक पालकांना या घटनेनंतर शाळेत पोहचल्यावर रडू कोसळले.