अभिजित पोते, पुणे : महाराष्ट्रासह देशभरात उकाड्यामुळे नागरीक हैराण झाले आहेत. सूर्य अक्षरश: आग ओकतोय की काय, असा बदल वातावरणात झाला आहे. राज्यासह देशभरात तापमानात चांगलीच वाढ बघायला मिळतेय. या तापमान वाढीमुळे अनेक नागरिकांना उष्माघाताचा त्रास होतोय. पुण्यातील कोरेगाव पार्कमध्ये सर्वात जास्त 42 अंश डिग्री सेल्सिअस कमाल तापमानाची नोंद झाली आहे. एप्रिल महिन्यात पुणे शहरातील हे सर्वोच्च तापमान आहे. पुणेकरांनी यामुळे बाहेर पडताना काढजी घेणे गरजेचे आहे.
आज पुन्हा तापमान वाढणार
पुणे शहरात आज पुन्हा तापमान वाढणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. काल देखील पुण्यात कमाल तापमानाची नोंद झाली होती. काल मध्यवर्ती पुण्यात 40 अंश सेल्सिअस डिग्रीच्या वर तापमान गेले होते. तर पुण्यातील कोरेगाव पार्कमध्ये सर्वात जास्त 42 अंश डिग्री सेल्सिअस कमाल तापमानाची नोंद झाली होती. पुणे जिल्ह्यात विचार करता सर्वाधिक तापमानाची नोंद तळेगाव ढमढेरेमध्ये झाली.
प्रशासकीय यंत्रणा सज्ज
पुणे शहरातील वाढत्या तापमानामुळे प्रशासकीय यंत्रणा देखिल सज्ज झाली आहे. वाढत्या उष्णतेच्या पार्श्वभूमीवर उपचारांची दिशा, औषधांची उपलब्धता, याबाबत शासनातर्फे जिल्हा शल्यचिकित्सक तसेच जिल्हा आरोग्य अधिकार्यांना देण्यात आल्या मार्गदर्शक सूचना देण्यात आल्या आहेत. शहरातील आरोग्य केंद्रांमध्ये तसेच दवाखान्यांमध्ये उष्माघातबाधित व्यक्तींच्या उपचारांसाठी औषधांचा मुबलक साठा ठेवणे, सर्व दवाखाने आणि इमारतींचे फायर सेफ्टी ऑडिट करण्या बाबतचे आदेश प्रशासनाकडून देण्यात आले आहे.
उष्णघातापासून अशी घ्या काळजी
उष्णता टाळायची असेल तर भरपूर पाणी प्या. कारण उन्हाळ्याच्या ऋतूत उन्हात चालल्याने खूप घाम येतो, ज्यामुळे आपल्या शरीरात पाण्याची कमतरता भासते. त्यामुळे जास्तीत जास्त पाणी, ज्यूस, नारळपाणी, लिंबूपाणी यांचे सेवन करावे. त्याचबरोबर जर तुम्हाला डिहायड्रेशनची समस्या असेल तर तुम्हाला चक्कर येणे, थकवा येणे यासारख्या समस्या उद्भवू शकतात.
जास्त वेळ बाहेर राहू नका
उन्हात बाहेर फिरण्यामुळे उष्माघात होऊ शकतो. त्यामुळे गरज नसेल तर बाहेर पडू नका. उन्हात जाताना कॅप, ओढणी, रुमालाच्या मदतीने शरीर झाकून ठेवा.
आरामदायी कपडे घाला
उन्हाळ्यात बाहेर गेल्यास आरामदायी कपडे घालावेत. कारण गडद रंगाचे कपडे जास्त उष्णता घेतात. त्यामुळे उन्हाळ्यात नेहमी हलके आणि सैल कपडे परिधान करा.
हे ही वाचा
पुणे शहरातील लोकांना काय आवडते | देशी मद्य, विदेशी मद्य, वाईन की बियर?