पुणे शहरातील नागरिकांचे वाहतूक कोंडीतून पुणेकरांची लवकरच सुटका होणार आहे. पुण्यातील वाहतूक कोडीं कमी करणे आणि वाहतुकीचा वेळ कमी करण्यासाठी शहरातील वाहतूक प्रमुख ३२ रस्त्यांवर साधरणा करण्यात येणार आहे. या रस्त्यांवर चौक सुधारणा, पार्किंग मॅनेजमेंट, वाहतूक नियंत्रण साधने, वाहतूक विलगीकरण टेक्नीक्स इत्यादी माध्यमातून अभिनव योजना राबवण्यात येणार आहे. यासाठी गुगलबरोबर करार करण्यात येणार आहेत. वाहतूक शाखा व पुणे महानगरपालिका यांच्या समन्वयातून एक अॅप्लीकेशन तयार करण्यात येणार आहे. यामुळे पुणे शहरातील रस्त्यांची कॅरींग कॅपेसिटी (जास्त वाहने जाण्याची क्षमता) वाढवण्यात येणार आहे.
पुणे शहरातील रस्त्यांचे उपयोगानुसार वर्गीकरण करण्यात येणार आहे. त्यावर रस्त्याबाबत काम करणाऱ्या इतर स्थानिक प्राधिकरणांचे मदतीने विशेष उपाययोजना करण्याचा प्रोजेक्ट सुरु करण्यात येणार आहे. त्यानुसार जास्तीत जास्तीत वाहतूक असणारे शहरातील रस्त्यांमध्ये लक्षणीय बदल करण्यात येणार आहेत. या मुख्य रस्त्यांवर वाहतुकीची गती संथ असेल अथवा या रस्त्यावर जर वाहतूक कोंडी होत असेल तर त्याचा ताण शहरातील अंतर्गत रस्त्यांवर येतो. त्यामुळे त्या ठिकाणी बदल होणार आहे.
रस्त्यावरील वाहतुकीचा वेग वाढवण्यासाठी या रस्त्यावर चौक सुधारणा होणार आहे. या ठिकाणी अद्ययावत सिग्नल यंत्रणा, पार्किंग मॅनेजमेंट, स्पिड ब्रेकर्स, रस्त्याची सरफेसींग, रस्त्यावरील अतिक्रमण काढणे, रस्त्यावर वाहतूक नियंत्रणाची साधने बसवणे, रस्त्यामधील मिसींग लिंक्स पूर्ण करणे, रस्त्यावरील वॉटर लॉगिंग पॉईंटस दुरुस्त करणे, या रस्त्यांवर नो हॉकर्स झोन करणे त्याची अंमलबजावणी करणे, रस्त्याबाबतच्या प्रलंबित कोर्ट केसबाबत पाठपुरावा करणे, रस्त्यांवरील अडथळा आणणाऱ्या झाडांबाबत उचित उपाययोजना करणे, अडथळा करणाऱ्या आस्थापनांवर कारवाई करणे तसेच या रस्त्यांवर वाहतूक विलगीकरण टेक्नीक्सचा वापर करणे असे सर्व कामे केली जाणार आहे.
पुणे शहरातील या मुख्य रस्त्यांना प्राधान्यक्रम देवून त्याची क्षमता वाढवण्यात येणार आहे. यामुळे वाहन चालकांचा मुख्य रस्त्यांवरुन जाण्याचा कल वाढेल. परिणामी रहिवाशी रस्ते, व्यापारी रस्ते यावरील ताण कमी हाईल. मुख्य रस्त्यावरुन वाहनांना एका सरासरी वेगाने जाता आले तर त्या रस्त्याची कॅरींग कपॅसिटी वाढते. म्हणजे वाहनांची संख्या वाढेल आणि जर सरासरी वेगापेक्षा कमी किंवा जास्त वेगाने वाहने गेली तर रस्त्यावर जाणाऱ्या वाहनांची संख्या घटते, हा फॉर्म्युला लक्षात घेऊन उपाय करण्यात येणार आहे.