पुणे शहरात एखाद्या चित्रपटाची शुटींग सुरु होती की काय? असा दृश्य दिसत होते. भररस्त्यावर सुरु असलेल्या या प्रकारामुळे वाहतूक थांबली होती. वाहतूक पोलीस अन् जमलेली लोक त्या दोघांना आवरण्याचा प्रयत्न करत आहे. परंतु त्यांचा रोमान्स सुरु होता.
Follow us on
पुणे : पुणे शहरातील सांस्कृतिक वातावरण बदलू लागले आहे. शहरातील बदलत जाणाऱ्या या संस्कृतीमुळे अनेक गार्डन अन् पर्यटन स्थळे लव्ह पाईंट झाली आहेत. आता सोशल मीडियावर व्हायरल झालेला हा व्हिडिओ पाहिल्यास हा प्रकार रस्त्यांवर सुरु झाला की काय? असा प्रश्न पुणेकरांना पडेल. परंतु सोशल मीडियावरील हा व्हायरल व्हिडिओ पुणे शहरातील आहे. या प्रकाराबाबत सुज्ञ पुणेकर संताप व्यक्त करत आहेत. भररस्त्यावर सुरु असलेल्या या प्रकारामुळे वाहतूक थांबली होती. वाहतूक पोलीस अन् जमलेली लोक त्या दोघांना आवरण्याचा प्रयत्न करत आहे. परंतु एखाद्या चित्रपटाप्रमाणे रस्त्यात त्यांचा रोमान्स सुरु आहे.
पुण्यातील एक व्हिडिओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे. व्हिडिओमध्ये रस्त्यावर एक कपल एकमेकांना अलिंगन देताना दिसत आहे. यादरम्यान वाहतूकही ठप्प झाली. वाहतूक पोलिसही या दोघांना हटवण्याचा प्रयत्न करत आहेत.
व्हायरल झालेला व्हिडिओ पुणे शहरातील चौकाचा आहे. जिथे एक जोडपे एकमेकांच्या मिठीत दिसत आहे. यावेळी रस्त्यावरील वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली होती. तरी त्यांना त्याची चिंता नव्हती. लोक आपल्या गाड्यांमधून उतरुन त्यांना वेगळे करण्याचा प्रयत्न करत आहे. वाहतूक पोलीस आपला प्रयत्न करत होते. परंतु त्या दोघांना रोमान्स सुरुच आहे. हे दृष्य सोशल मीडियावर पाहून पुणेकर अस्वस्थ होत आहेत.
काय कारवाई झाली का
खरंतर या कपलवर कारवाई होण्याची गरज होती. परंतु रोमान्स करुन जसे काहीच झाले नाही, या पद्धतीने ते दोघे रवाना झाल्याचे दिसत आहे. या प्रकाराबदल पुणे शहरातून संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत.