36 बँकांमधील रक्कम सायबर चोरट्यांनी लांबवली, सायबर ठगांनी पुण्यातील महिलेला लाखांमध्ये फसवले

| Updated on: May 02, 2023 | 8:56 AM

online fraud pune : पुणे शहरात फसवणुकीचा आणखी एक प्रकार सुरु आहे. तब्बल सहा वर्षे ही फसवणूक सुरु होती. यामध्ये ३६ बँकांमधील रक्कम गेली. आता या प्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे. पोलीस या फसवणुकीच्या प्रकाराने अचंबित झाले आहे.

36 बँकांमधील रक्कम सायबर चोरट्यांनी लांबवली, सायबर ठगांनी पुण्यातील महिलेला लाखांमध्ये फसवले
ऑनलाईन टास्कच्या नावाखाली फसवणूक
Image Credit source: Google
Follow us on

अभिजित पोते, पुणे : डिजिटलच्या युगात चोरटे डिजिटल झाले आहेत. लोकांना गंडवण्याचे नवनवीन प्रकार ते शोधत आहेत. आता पुणे (pune crime news) येथील महिलेची चोरट्यांनी फसवणूक केली आहे. परंतु फसवणुकीचा हा प्रकार अद्यावत आहे. पुण्यातील ६२ वर्षीय महिला फसवणुकीची बळी ठरली. डिजिटल चोरट्यांनी त्यांच्या ३६ बँकांमधील रक्कम लांबवली आहे. फसवणूक झाल्यानंतर महिलेने आता पोलीस स्टेशन गाठले आहे. जास्त पैशांचे आमिष दाखवत पॉलिसीच्यास नादात सायबर चोरटयांनी महिलेला मोठा गंडा घातला आहे.

कशी केली फसवणूक

पुण्यात वृद्ध महिलेची लाखो रुपयांमध्ये फसवणूक झाली आहे. पॉलिसीच्या नादात सायबर चोरटयांनी ही फसवणूक केलीय. पॉलिसी काढून देण्याच्या बहाण्याने सायबर चोरट्यांनी महिलेची तब्बल ५५ लाख रुपयांमध्ये फसवणूक केली. त्यात त्यांच्या विविध ३६ बँकांमधील एकूण ५५ लाख रुपये गेले आहेत. एप्रिल २०१४ ते जून २०२० पर्यंत फसवणुकीचा हा प्रकार सुरु होता. सायबर चोरट्यांनी बनावट कागदपत्रे आणि पॉलिसीची बनावट पावती करुन त्यांची फसवणूक केलीय. ६२ वर्षीय महिलेने या संदर्भात सायबर पोलिसांकडे तक्रार दिली आहे.

हे सुद्धा वाचा

विश्वास संपादक करत केली फसवणूक

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आम्ही लाईफ पॉलिसी काढून देऊ तसेच त्याचावर मोठा फायदा काढून देऊ, असे आश्वासन या सायबर चोरट्यांनी फिर्यादी महिलेस दिले. आम्ही बँकेचे कर्मचारी आहोत, हे अनेक वेळा सांगून त्यांनी त्या महिलेचा विश्वास संपादन केला. त्यानंतर बँकेत पैसे जमा करायला सांगितले. या भुल थापला बळी पडून या महिलेने पैसे जमा करण्यास सुरुवात केली.

या महिलेने वेळोवेळी काही रक्कम विविध ३६ बँकांमध्ये जमा केली. पैसे भरल्याची बनावट पावती देखील या सायबर चोरट्यांनी त्यांना दिली. हा सगळा प्रकार २०१४ ते २०२० पर्यंत सुरू होता. ज्यावेळेस आपल्याला एक ही रुपया मिळत नसून आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर या महिलेने पोलिसात धाव घेतली.

पोलिसांचे आवाहन

पोलिसांनी ऑनलाईन चोरट्यांकडून फसवणूक टाळण्यासाठी खबरदारी घेण्याचे आवाहन नागरिकांना केले आहे. लोकांनी अनोळखी व्यक्तीशी कोणताही व्यवहार करुन नये, आपले ओटीपी व बँक खात्याची माहिती कोणाला देऊ नये, सोशल मीडियावर आपली वैयक्तीक माहिती देऊ नये, असे आवाहन केले आहे.