पुणे : एखादी महिला वर्ल्ड टूरसाठी जाणे हे नवीन नाही. परंतु मोटारसायकवर साडी परिधान करुन वर्ल्ड टूर करणे म्हणजे काही वेगळेच. हे वेगळेपण करणारी महिला पुणेरीच असणार, हा तुमचा अंदाज बरोबर आहे. पुणे शहरातील २७ वर्षीय महिला उद्योजक रमिला लटपटे या जागतिक प्रवासाला निघाल्या आहेत. 20 ते 30 देशांचा प्रवास करणार आहे आणि सुमारे 100,000 किलोमीटरचे अंतर त्या आपल्या मोटारसायकलने पार करणार आहेत. त्यांनी पारंपरिक मराठी साडी नेसून मोटरसायकलवरून या प्रवास सुरु केला आहे.
गेटवे ऑफ इंडियापासून सुरुवात
रमिला लटपते यांनी ९ मार्च रोजी दुपारी साडेचार वाजता मुंबईतील गेटवे ऑफ इंडिया येथून आपला प्रवास सुरू केला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांना शुभेच्छा दिल्या. 8 मार्च 2024 रोजी त्या आपला जागतिक प्रवास संपवून परत येणार आहे.
काय आहे उद्देश
राज्याची विशिष्ट उत्पादने, राज्याची संस्कृतीची ओळख जगभरात करुन देणे हा त्यांचा उद्देश आहे. प्रवाशा दरम्यान भारतीय संस्कृतीचे जतन आणि संवर्धन करणे हे त्यांचे ध्येय आहे. म्हणूनच ती साडी नेसून त्या प्रवास करत आहेत.
आव्हान आवडते
संस्कृतीचा प्रचार करणे आणि नवीन देशांचा प्रवास करणे ही रमिला लटपटे यांची आवड आहे. त्यांना आव्हानात्मक कामांची आवड आहे. मोटारसायकल चालवतांना नेहमी हेल्मेटचा वापर करण्याचे त्यांनी सांगितले. भारतीय संस्कृतीचा प्रसार हा एक सकारात्मक उपक्रम आहे. तथापि, आपल्या सुरक्षिततेला प्राधान्य देणे तितकेच महत्त्वाचे आहे.