Pune Crime News | प्रेमात ती आकंठ बुडाली, प्रियकरासाठी तिने सर्वच केले, परंतु असे काही घडले की…

| Updated on: Sep 16, 2023 | 12:25 PM

Pune Crime News | पुणे शहरातील त्या दोघांचे एकमेकांवर प्रेम होते. परंतु दरम्यान एक धक्कादायक घटना घडली आहे. प्रेम प्रकरणात ही घटना घडल्यामुळे तिने शेवटचे पाऊल उचलले. आता या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Pune Crime News | प्रेमात ती आकंठ बुडाली, प्रियकरासाठी तिने सर्वच केले, परंतु असे काही घडले की...
Follow us on

पुणे | 16 सप्टेंबर 2023 : मी तुझ्यासाठी तारेही तोडून आणेल, असे डॉयलॉग हिंदी चित्रपटात नेहमी दिसतात. त्याची पुनरावृत्ती प्रेमवीर आपल्या आयुष्यात करतात. परंतु पुणे शहरात घडलेल्या घटनेत उलट प्रकार समोर आला आहे. तिने त्याच्यासाठी सर्व काही केले. नेहमी त्याची मागणी पूर्ण केली. अडचणीत असताना त्याला सातत्याने मदत केली. कारण तिने त्याच्यावर प्रेम केले होते. परंतु त्याने आश्वासन दिल्यानंतर पाळले नाही. त्यामुळे तिने शेवटचे पाऊल उचलले. अखेर या प्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे.

काय घडला प्रकार

पुणे शहरातील आदर्श अजयकुमार मेनन (वय 25) आणि राणी उर्फ रसिका रवींद्र दिवटे (वय 25) असे हे प्रेमीवर होते. आदर्श आणि रसिका यांचे काही वर्षांपासून प्रेमसंबंध होते. त्यामुळे एकमेकांना हवी ती मदत ते करत होते. आदर्शला पैशांची गरज होती. त्याच्या सांगण्यावरुन रसिकाने त्याच्यासाठी विविध मार्गाने तीन लाख 75 हजार रुपयांचे कर्ज घेतले होते. या कर्जाचे हप्ते आदर्श फेडणार होता. क्रेडिट कार्डवरुन पर्सनल लोन आणि इतर काही लोन ॲपवरून हे कर्ज घेतले होते.

मग आदर्शने काय केले

कर्जाचे हप्ते फेडण्याचे आश्वासन आदर्शने दिले होते. परंतु त्याने कर्जाचे हफ्ते फेडण्यास नकार दिला. यामुळे दोघांमध्ये अनेकवेळा भांडण देखील झाले होते. परंतु त्यानंतर आदर्श काही हप्ते भरत नव्हता. यामुळे रसिकाने 14 सप्टेंबर रोजी टोकाचे पाऊल उचलले. तिने तिच्या राहत्या घरात गळफास घेत जीवन संपवले. पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.

हे सुद्धा वाचा

आदर्शविरुद्ध गुन्हा दाखल

एखादा प्रियकर असे काही करेल असे रसिकाला वाटत नव्हते. यामुळे कर्जाचे हफ्ते न फेडल्याने तिने स्वतःला संपवले. या घटनेमुळे पुणे शहरात एकच खळबळ उडाली आहे. पोलिसांनी (Pune Police) याप्रकरणी प्रियकराविरुद्ध गुन्हा दाखल करत त्याला अटक केली आहे. मांजरीत घडलेल्या या प्रकारानंतर हडपसर पोलिसांनी या प्रकरणी आदर्शविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. त्याला अटकही केली आहे.