पुणे : रणरणत्या उन्हानंतरही पुणे एप्रिलमध्ये अपेक्षेपेक्षा तुलनेने थंड आहे. भारतीय हवामानशास्त्र विभागाने (IMD) सादर केलेल्या आकडेवारीनुसार एप्रिलच्या सुरुवातीपासून पारा केवळ तीन वेळा 40 अंश सेल्सिअसच्या वर पोहोचला आहे. यावर्षी 7 एप्रिल, 8 एप्रिल आणि 26 एप्रिल रोजी शिवाजीनगरमध्ये दिवसाचे तापमान (Temperature) 40.1 अंश सेल्सिअस नोंदवले गेले. भारतीय हवामान विभागाच्या डेटानुसार, हवामानाचा विचार करता हा एप्रिल असामान्य होता. गेल्या काही वर्षांतील एप्रिल महिन्याच्या तुलनेत थंडी जास्त होती. 1987मध्ये 43.3 अंश सेल्सिअस एप्रिलमधील सर्वोच्च तापमानाची नोंद झाली होती. एप्रिल 2019मध्ये, शहराचे तापमान 43 अंश सेल्सिअस (Celsius) नोंदवले गेले आणि 2020मध्ये 40.1 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली होती. मंगळवारी नोंदवलेले दिवसाचे तापमान सामान्यपेक्षा केवळ दोन अंश सेल्सिअसने जास्त होते.
चिंचवड आणि लव्हाळे या शहराच्या इतर भागांमध्ये दिवसाचे तापमान 41 अंश सेल्सिअसपेक्षा जास्त नोंदवले गेले. तथापि, गेल्या दशकातील डेटा सूचित करतो, की एप्रिलमध्ये दिवसाचे तापमान 43 अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचू शकते. IMD पुणे येथील हवामान अंदाज विभागाचे प्रमुख अनुपम कश्यपी यांनी सांगितले, की मंगळवारी पुण्यातील पाषाणसारख्या भागात दिवसाचे तापमान 40.3 अंश सेल्सिअसवर पोहोचले. चिंचवड आणि मगरपट्टा येथे दिवसाचे तापमान अनुक्रमे 41.3 आणि 41 अंश सेल्सिअस नोंदवले गेले. लव्हाळे यांनी मंगळवारी दिवसभरात 40.4 अंश सेल्सिअस तापमान नोंदवले. मंगळवारी दिवसाचे तापमान 39.5 अंश सेल्सिअसवर पोहोचल्याने लोहेगाव तुलनेने थंड होते.
28 एप्रिलपासून मध्य महाराष्ट्रातील काही भागात महिनाअखेरपर्यंत उष्णतेची लाट सदृश परिस्थिती जाणवू शकते. परंतु पुण्यात पारा 40 अंश सेल्सिअसच्या आसपास जाऊ शकतो. महिन्याच्या अखेरीस दिवसाचे तापमान 39 ते 40 अंश सेल्सिअस दरम्यान, बदलू शकते आणि आकाश निरभ्र राहील. यासोबतच शहरातील रात्रीच्या तापमानातही वाढ झाली आहे. IMDच्या म्हणण्यानुसार, या एप्रिलमध्ये गेल्या दशकातील दुसरी सर्वात थंड रात्र दिसली जेव्हा 1 एप्रिल रोजी पारा 14.5 अंश सेल्सिअसपर्यंत घसरला. त्यानंतर पुण्यात रात्रीच्या तापमानात लक्षणीय वाढ होऊन उष्णतेत भर पडली.