पुणे शहरातील स्टार्टअप कंपनीने बनवली देशातील पहिली इलेक्ट्रीक सोलर कार

| Updated on: Feb 03, 2023 | 3:57 PM

मुंबई, पुणे, नागपूरसह सामान्य शहरे लक्षात घेऊन कार बनवण्यात आली आहे. विशेष डिझाइनमुळे गर्दीच्या ठिकाणांवरुन सोयीस्कर प्रवास या गाडीने करता येणार आहे.

पुणे शहरातील स्टार्टअप कंपनीने बनवली देशातील पहिली इलेक्ट्रीक सोलर कार
Follow us on

पुणे : सध्या देशात इलेक्ट्रीक कारचा बोलबाला आहे. त्यामुळे तुम्ही कार खरेदी करण्याच्या विचारात असला तर जरा थांबा. दिल्लीत नुकत्याच झालेल्या ऑटो एक्सपो 2023 मध्ये अनेक वाहन कंपन्यांनी एकापेक्षा एक सरस मॉडल सादर केले. त्यात इलेक्ट्रिक व हायब्रिड कार होत्या. परंतु पुणे येथील स्टार्टअप Vayve Mobility (वायवे मोबिलिटी) ने ऑटो एक्सपोमध्ये सादर केलेली कार सर्वांचे आकर्षण ठरली. या कंपनीने सोलर व इलेक्ट्रिक कार Eva (ईवा) आणली. ही कार वर्षभरात बाजारात येणार आहे.

पुण्यातील स्टार्टअप कंपनीने पुढे जाऊन मोठे पाऊल टाकले आहे. वायवे मोबिलिटीने (Vayve Mobility) देशातील पहिली इलेक्ट्रिक व सौरउर्जेवर चालवणारी कार बनवली आहे. ही कार लवकरच बाजारात येणार आहे. तिचे नाव Eva आहे. देशातील ही पहिली सोलर इलेक्ट्रिक कार असल्याचा दावा कंपनीकडून केला जात आहे.

गाडी बनवताना शहरांचा विचार

हे सुद्धा वाचा

वायवे मोबिलिटीचे सहसंस्थापक विलास देशपांडे यांनी सांगितले की, मुंबई, पुणे, नागपूरसह सामान्य शहरे लक्षात घेऊन कार बनवण्यात आली आहे. विशेष डिझाइनमुळे गर्दीच्या ठिकाणांवरुन सोयीस्कर प्रवास या गाडीने करता येणार आहे. कारमध्ये दोन वयस्क व एक मुल बसू शकते. कारला दोन दरवाजे आहेत.

कार सर्व वयोगट लक्षात घेऊन बनवण्यात आले आहे. अगदी मुलांना शाळेत सोडण्यासाठी चांगला उपयोग या गाडीचा तुम्हाला होऊ शकतो, असे देशपांडे यांनी सांगितले.

वर्षभरात 3000 किलोमीटर सोलरवर

कार रोज 10 ते 12 किलोमीटर सोलरवर चालणार आहे. म्हणजेच एक वर्षात सुमारे 3 हजार किलोमीटर सोलर चालणार आहे. वर्षभरात 9 हजार किलोमीटर कोणतीही कार चालते.

70 किमी वेग

गाडीचा वेग 70 किलोमीटर प्रतितास आहे. गाडीत 14Kwh क्षमतेची बॅटरी लावण्यात आली आहे. एकदा चार्ज केल्यावर 250 किलोमीटरपर्यंत गाडी चालणार आहे. कारच्या टपावर सोलर पॅनल देण्यात आले आहे. परंतु ही कार पुर्ण सोलर उर्जेवर चालणार नाही. सोलर पॅनल हा एक पर्याय देण्यात आला आहे. सोलर पॅनलमुळे 10 किलोमीटरचा अतिरिक्त मायलेज वाढणार आहे. गाडीला प्रतिकिलोमीटर फक्त 80 पैसे खर्च येणार आहे.

घरातील वीजेवर चार तासांत ही गाडी चार्ज होणार आहे. वर्षभरात ही गाडी बाजारात येणार असल्याचा दावा कंपनीकडून करण्यात आला. स्टार्टअप कंपनी वायवे मोबिलिटी गेल्या दोन वर्षांपासून ईवावर काम करत आहे.उत्तर प्रदेशात झालेल्या 2023 ऑटो एक्सपोमध्ये गाडीच्या प्रोटोटाइपचे अनावरण करण्यात आले. 2024 मध्ये व्यावसायिकरित्या बाजारात उपलब्ध होणार आहे.