पुणे : मागच्या काही दिवसांपासून पुण्यात कोरोनाचा आलेख सातत्यानं कमी होताना दिसत आहे. दिवसभरात आढळणाऱ्या कोरोनाबाधितांच्या संख्येतही लक्षणीय घट पहायला मिळत आहे. गेल्या २४ तासांत पुणे शहरात नव्याने १८२ कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. पुणे शहरातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या आता ४ लाख ९१ हजार ४४४ वर गेली आहे. (In the last 24 hours, 182 new coronavirus patients have been registered in Pune city)
पुणे कोरोना अपडेट : शुक्रवार दि. २० ऑगस्ट, २०२१
◆ उपचार सुरु : २,१४६
◆ नवे रुग्ण : १८२ (४,९१,४४४)
◆ डिस्चार्ज : २१६ (४,८०,४२४)
◆ चाचण्या : ९,६६८ (३०,४५,८९१)
◆ मृत्यू : ६ (८,८७४)#PuneFightsCorona #CoronaUpdate pic.twitter.com/zaSkxDIgXa— Murlidhar Mohol (@mohol_murlidhar) August 20, 2021
पुणे शहरातील 216 कोरोनाबाधितांना आज डिस्चार्ज देण्यात आला आहे. त्यानंतर आतापर्यंत कोरोना रुग्णांवर उपचार होऊन डिस्चार्ज झालेल्या रुग्णांची संख्या 4 लाख 80 हजार 424 झाली आहे. पुणे महापालिका हद्दीत नव्याने 6 कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. आजच्या नव्या संख्येसह मृतांची एकूण संख्या 8 हजार 874 वर गेली आहे.
पुणे शहरात सध्या २ हजार १४६ रुग्ण विविध रुग्णालयांमध्ये कोरोनावर उपचार घेत आहेत. या रुग्णांपैकी 208 रुग्ण गंभीर तर 258 रुग्ण ऑक्सिजनद्वारे उपचार घेत आहेत.
गंभीर कोरोनाबाधितांची संख्या २०८ !
पुणे शहरात उपचार घेणाऱ्या २ हजार १४६ रुग्णांपैकी २०८ रुग्ण गंभीर तर २५८ रुग्ण ऑक्सिजनद्वारे उपचार घेत आहेत.#PuneFightsCorona
— Murlidhar Mohol (@mohol_murlidhar) August 20, 2021
पुणे शहरात आज एकाच दिवसात 9 हजार 668 नमुने घेण्यात आले आहेत. पुणे शहराची एकूण टेस्ट संख्या आता 30 लाख 45 हजार 892 इतकी झाली आहे. कोरोनाचं संक्रमण रोखण्यासाठी टेस्टची संख्या वाढवण्यासोबतच लसीकरणावरही भर दिला जात आहे.
दिवसभरात ९ हजार ६६८ टेस्ट !
पुणे शहरात आज एकाच दिवसात ९ हजार ६६८ नमुने घेण्यात आले आहेत. पुणे शहराची एकूण टेस्ट संख्या आता ३० लाख ४५ हजार ८९१ इतकी झाली आहे.#PuneFightsCorona
— Murlidhar Mohol (@mohol_murlidhar) August 20, 2021
संबंधित बातम्या :