मनपाचा अर्थसंकल्प | पीएमपीएलसाठी बजेटमध्ये 470 कोटींची तरतूद

| Updated on: Mar 24, 2023 | 2:31 PM

पुणे महानगरपालिकेचा अर्थसंकल शुक्रवारी सादर करण्यात आला. नगरसेवक नसताना सादर केला गेलेला हा अर्थसंकल्प आहे. अर्थसंकल्पात पीएमपीएलसाठी बजेटमध्ये 470 कोटींची तरतूद आयुक्त विक्रम कुमार यांनी केली आहे.

मनपाचा अर्थसंकल्प | पीएमपीएलसाठी बजेटमध्ये 470 कोटींची तरतूद
पुणे महानगरपालिका
Image Credit source: टीव्ही९ नेटवर्क
Follow us on

योगेश बोरसे, पुणे : पुणे महापालिकेचा २०२३-२४ चा अर्थसंकल्प शुक्रवारी आयुक्त विक्रम कुमार यांनी सादर केला. नगरसेवक नसताना हा अर्थसंकल्प सादर केला गेला आहे. पुणे महापालिकेच्या २०२२-२३चा अर्थसंकल्प ८ हजार ५९२ कोटींचे सादर केला होता. आता हा अर्थसंकल्प 9515 कोटींचा आहे. नवीन 23 गावांच्या समावेशामुळे बजेटमध्ये यावर्षी वाढ झाली आहे. पीएमपीएलसाठी बजेटमध्ये 470 कोटींची तरतूद करण्यात आली आहे. राज्यातील नागपूर आणि उल्हासनगर मनपाचाही अर्थसंकल्प आज सादर झाला.

पुणे मागील वर्षापेक्षा वाढीव अर्थसंकल्प


सध्या राज्यातील सर्व महापालिकामध्ये प्रशासकांच्या माध्यमांमधून कामकाज केले जात आहे.त्या पार्श्वभूमीवर आगामी 2023-24 करीता पुणे महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांनी 9 हजार 515 कोटींचा अंदाजपत्रक सादर केला आहे. गतवर्षी 8 हजार 500 कोटींचा अंदाजपत्रक सादर करण्यात आला होता.त्यात जवळपास हजार कोटींची वाढ केल्याचे स्पष्ट होत आहे.यामध्ये प्रामुख्याने 24 तास समान पाणी पुरवठा,34 समाविष्ट गाव आणि रस्त्यांना या अंदाजपत्रकात अधिक प्राधान्य देण्यात आले आहे. अर्थसंकल्पानुसार, पगार आणि पेन्शनवर सुमारे 3100 कोटी खर्च होणार आहे.

हे सुद्धा वाचा

यंदाच्या अर्थसंकल्पात सर्वाधिक तरतूद पाणीपुरवठा केली आहे. पाणी पुरवठ्यासाठी 1321 कोटी रुपयांची तरतूद केली आहे. मलिनिसरणसाठी ८१२ कोटी रुपयांचा निधी ठेवला आहे. घनकचरा व्यवस्थापनसाठी ८४६ कोटींची तरतूद करण्यात आली आहे. वाहतूक नियोजन आणि प्रकल्पासाठी 590 कोटी रुपये ठेवले आहे.

नागपुरातही वाढ नाही

नागपूर महानगरपालिकेचा २०२३-२४ चा ३२६७ कोटींचा अर्थसंकल्प सादर करण्यात आलाय. या अर्थसंकल्पात मालमत्ता करात कुठलीही वाढ केलेली नसल्याने नागपूरकरांना मोठा दिलासा मिळालाय. नागपूरात साडेसहा लाख मालमत्तांवर कर आकारला जातोय, यंदा मालमत्ता करात वाढ न केल्यामुळे या साडेसहा लाख मालमत्ताधारकांना दिलासा मिळालाय. यासोबतच कोरोनानंतरचे आरोग्याची आव्हानं लक्षात घेता, आरोग्य विभागासाठी ८१ कोटींची तरतूद करण्यात आलीय. यात पाच कोटी रुपयांची साथ रोग नियंत्रणासाठी तरतूद करण्यात आलीय. महानगरपालिका आयुक्त आणि प्रशासक राधाकृष्णण बी यांनी हा अर्थसंकल्प सादर केलाय.

या सुविधांवर नागपुरात भर

नागपूरातील रस्ते, पथ दिवे, आरोग्य सेवा, घनकचरा व्यवस्थापन, मलमिस्सारणासारख्या नागरी सुवाधांवर या बजेटमध्ये विशेष भर देण्यात आलाय. “नागपूर महानगरपालिकेचा २०२३-२४ चा ३२६७ कोटींचा अर्थसंकल्प आतापर्यंतचा सर्वात मोठा अर्थसंकल्प असून, २०२३-२४ या वर्षांच नागपूर मनपाकडून ३३३६.८४ कोटी रुपयांच्या उत्पन्नाचं उद्दीष्ट ठेवण्यात आलंय” अशी माहिती मनपा आयुक्तांनी दिलीय. मालमत्ता कर न वाढवता उत्पन्नाच्या इतर सोर्सेसवर भर देण्यात येणार, असंही त्यांनी सांगितलंय.

उल्हासनगरात शिलकीचा अर्थसंकल्प

उल्हासनगर महापालिकेनं ८४३ कोटी रुपयांचा शिलकीचा अर्थसंकल्प सादर केला. महापालिका प्रशासनाने आयुक्त अजीज शेख यांना हा अर्थसंकल्प सादर केला. या अर्थसंकल्पात आरोग्य, शिक्षण आणि परिवहन सेवेसाठी कोट्यवधींची भरीव तरतूद करण्यात आली असली, तरी मालमत्ता कर वसुलीच्या माध्यमातून उत्पन्नाच्या बाबतीत मात्र महापालिकेला अपयश आल्याचं पाहायला मिळतंय.

उल्हासनगर महापालिकेचा अर्थसंकल्प हा ८४३ कोटी ७२ लाख रुपये उत्पन्न आणि ८४३ कोटी २६ लाख खर्च असा शिलकीचा अर्थसंकल्प आहे. उल्हासनगर महापालिकेत मालमत्ता कराची सुमारे ६५३ कोटी रुपयांची थकबाकी आहे. त्यात यंदाच्या आर्थिक वर्षात महापालिकेनं अवघ्या ४० कोटी रुपयांचीच वसुली केली आहे. त्यामुळं पालिका प्रशासनापुढे उत्पन्नवाढीचं आव्हान आगामी वर्षातही कायम असणार आहे. या अर्थसंकल्पात परिवहन सेवा नव्याने सुरू करण्याची घोषणा महापालिकेनं केली आहे. त्यासाठी १९ कोटी ५ लाख रुपये, तसंच नवीन बस डेपोसाठी २ कोटी ५० लाख रुपयांची तरतूद करण्यात आलीये.