पुणे शहरातील किती पूल आहे धोकादायक, तुम्हाला लवकरच मिळणार माहिती

| Updated on: Apr 07, 2023 | 11:38 AM

पुणे महानगरपालिकेने मोठा निर्णय घेतला आहे. पुणे शहरातील 40 पुलांची वयोमान 10 वर्षांपेक्षा जास्त झाले आहे. त्यातील महत्वाचा असणारा हडपसर आणि साधू वासवानी चौकातील उड्डाणपूल धोकादायक स्थितीत आहे. यामुळे शहरातील पुलांचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्यात येणार आहे.

पुणे शहरातील किती पूल आहे धोकादायक, तुम्हाला लवकरच मिळणार माहिती
पुणे पूल
Follow us on

योगेश बोरसे, पुणे : पुणे शहारातील चांदणी चौकात नवीन पूल बांधण्याचे काम वेगाने सुरु आहे. या पुलामुळे पुणेकरांना आणखी एक चांगली सुविधा मिळणार आहे. येत्या १ मे रोजी हा पूल वाहतुकीसाठी खुला होणार आहे. यामुळे चांदणी चौक येथील वाहतुकीची कोंडी दूर होणार आहे. एकीकडे पुणे शहरात नवीन पूल बांधण्याचे काम वेगाने सुरु असताना जुने झालेले अनेक पूल आहेत. या पुलांचे आयुष्य संपले आहे.  या पुलासंदर्भात पुणे महानगरपालिकेने महत्वाचा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे भविष्यात होणारी दुर्घटना टाळली जाणार आहे.

काय करणार पुणे मनपा


पुणे शहरातील 40 उड्डाणपुलांचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्याचा निर्णय पुणे महानगरपालिकेने घेतला आहे. स्ट्रक्चरल ऑडिटनंतर ज्या पुलांची दुरुस्ती गरजेची आहे, त्यासाठी महानगरपालिकेने अर्थसंकल्पात तरतूद केली आहे. सुमारे 20 कोटी रुपयांची तरतूद पुलांच्या दुरुस्तीसाठी केली आहे. हडपसर आणि साधू वासवानी चौकातील उड्डाणपूल धोकादायक स्थितीत आहे. यामुळे त्यासारखी किती पूल धोकादायक आहे, हे स्ट्रक्चरल ऑडिटमधून स्पष्ट होणार आहे. महाड येथील सावित्री नदीवरील पुलाची दुर्घटना घडल्यानंतर राज्यातील पुलांचे स्ट्रक्चरल ऑडिट केले जाते.

हे सुद्धा वाचा

शहरात आहेत ब्रिटीशकालीन पूल

पुणे शहरात मुळा-मुठा नदीवर ब्रिटिशकालीन पूल आहेत. यामध्ये मुठा नदीवर छत्रपती संभाजी पूल (लकडी पूल), छत्रपती शिवाजी पूल (नवा पूल), जुना संगम पूल, वेलस्ली पूल, बंडगार्डन पूल, जुना हॅरिस पूल यांचा समावेश आहे. हे सगळे पूल १०० वर्षांपेक्षा जास्त जुने आहेत.पुणे शहरातील ३१ पूल ब्रिटशकालीन आहेत. त्यांचेही ऑडिट यामुळे होणार आहे.

40 पुलांची वयोमान 10 वर्षांपेक्षा जास्त

पुणे शहरातील 40 पुलांची वयोमान 10 वर्षांपेक्षा जास्त झाले आहे. त्यातील महत्वाचा असणारा हडपसर आणि साधू वासवानी चौकातील उड्डाणपूल धोकादायक स्थितीत आहे. त्यासंदर्भात लवकर निर्णय होणे अपेक्षित आहे. मुळा आणि मुठा नदीच्या दोन्ही बाजूने पुणे शहराचा मोठा विकास झाला आहे. त्यामुळे वाहतूक प्रचंड प्रमाणात वाढली आहे. शहरातील वाहतूक सुरळीत करण्यास पुलांचे महत्त्व विशेष आहे. तसेच आगामी ५० वर्षांचा वाहतुकीचा प्रश्‍न लक्षात घेऊन आणखी काही पूल प्रस्तावित आहेत.

हे ही वाचा


पुण्यातील राजकीय नेत्यांना धमकी देत खंडणी मागणाऱ्या आरोपीला बेड्या

पुणेकरांनो वाहतुकीचे नियम पाळा, पाहा वर्षभरात किती कोटींचा झाला दंड