पुणे : पुणे शहरातील नागरिकांना आता पाणी जपून वापरावे लागणार आहे. पावसाळा सुरु होईपर्यंत पाणी कपातीचे संकट पुणेकरांवर असणार आहे. कारण पुणे शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या अनेक प्रकल्पाचा साठा घसरला आहे. यामुळे पुणे शहरावर पाणी कपातीचे संकट निर्माण झाले आहे. यंदा एल निनोमुळे मॉन्सून (Monsoon) लांबणीवर पडण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. तसेच जून-जुलै महिन्यांत समाधानकारक पाऊस पडणार नसल्याचा अंदाज आहे. त्यामुळे पुणेकरांना आतापासून उपलब्ध पाण्याचे नियोजन करावे लागणार आहे.
जलसाठा किती घसरला
पुणे जिल्ह्यातील भीमा खोऱ्यातील २६ धरणांपैकी २१ धरणांमधील जलसाठा घसरला आहे. हा जलसाठा ५० टक्क्यांपेक्षा कमी झाला आहे. त्यामुळे पुढील चार महिन्यांचे योग्य नियोजन करावे लागणार आहे. पुणे जिल्हा प्रशासनाला यासंदर्भात सूचना देण्यात आल्या आहेत. पुणे जिल्ह्यात उजनीसह लहान मोठ्या एकूण २६ धरणांतील उपयुक्त पाणीसाठ्याची क्षमता १९८.३४ टीएमसी आहे. यंदा या धरणांमध्ये २०२.६७ टीएमसी म्हणजेच १०२ टक्के जलसाठा झाला होता. परंतु पाण्याचा वापर मोठ्या प्रमाणात झाला आहे. त्यामुळे धरणांत गेल्या वर्षीच्या तुलनेत कमी साठा शिल्लक आहे.
पाणीपातळीत वेगाने घट
पुणे जिल्ह्यातील खडकवासला,चासकमान, वीर, डिंभे, विसापूर, उजनी या धरणांतून पाण्याचा डाव्या, उजव्या कालव्याला पाण्याचा विसर्ग सोडण्यात आला आहे. या विसर्गाचा वापर शेतीसाठी केला जात आहे. याशिवाय खडकवासला, पवना, गुंजवणी, भाटघर, नीरा देवघर या धरणांतून बंद जलवाहिनीद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे. त्यामुळे धरणातील पाणीपातळी वेगाने कमी होत आहे.
कोणत्या धरणात किती साठा शिल्लक
हे ही वाचा
Good News : मुंबई- पुणे दरम्यान अंतर कमी करणारी बातमी, कधी सुरु होणार हा प्रकल्प
मुंबई-पुणे एक्स्प्रेसवर अपघात टाळण्यासाठी अत्याधुनिक यंत्रणा, १६० कोटींचा कसा आहे प्रकल्प