पुणे | 14 ऑगस्ट 2023 : भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षाचा यंदा समारोप होणार आहे. यानिमित्त देशभरात विविध उपक्रम घेतले जात आहे. घर घर तिरंगा, हा उपक्रमही राबण्यात येत आहे. स्वातंत्र्य दिनाच्या उत्साह सर्वत्र दिसणार आहे. त्याचवेळी राज्यातील गड, किल्ल्यांवर प्रथमच ध्वजारोहण होणार आहे. पुणे जिल्ह्यातील १६ गड किल्ल्यांवर ध्वजारोहण होणार आहे तर देशभरातील एकून ७५ गड किल्ल्यांवर ध्वज फडकवण्यात येणार आहे. यामुळे इतिहासाला नवा उजाळा मिळणार आहे. गडकिल्ल्यांवर ध्वजारोहण जवानांच्या हस्ते होणार आहे.
भारतीय लष्कराच्या सदर्न कमांडकडून देशातील ७५ किल्ल्यांवर तिरंगा ध्वज फडकावण्याची मोहीम हाती घेतली आहे. पुणे येथील सदर्न कमांडकडून ही विशेष मोहिम राबवली जात आहे. लष्कराचे जवान तिरंगा फडकवणार आहे. त्यासाठी १५ ऑगस्ट रोजी सकाळी सैन्य दलासोबत गिर्यारोहक आणि शिवप्रेमीही असणार आहे. यामुळे इतिहासाला उजाळा मिळणार आहे.
पुणे जिल्ह्यात अनेक गड आणि किल्ले आहे. त्यातील १५ ठिकाणी तिरंगा ध्वज फडकवण्यात येणार आहे. पुणे शहराजवळ असलेल्या सिंहगडावर तिरंगा जवानांच्या हस्ते फडकवण्यात येईल. सोबत रोहिडा, हडसार, जीवधन, चावंडगड या किल्ल्यांवर ध्वजारोहण आहे. शिवाजी महाराजाचे जन्मस्थळ असलेल्या जुन्नर तालुक्यातील शिवनेरी येथेही ध्वजारोहण होईल. पुणे जिल्ह्याच्या वेल्हा तालुक्यातून गेलेल्या सह्याद्रीच्या रांगेत असलेल्या तोरणावर किल्ल्यावर तिरंगा फडकणार आहे. भोरगिरी, पुरंदर, राजगड, विसापूर, लोहगड, तिकोना, कोरीगड, तुंग या किल्ल्यांवर ध्वजारोहण करण्यात येणार आहे.
पुणे जिल्ह्यातच नाही तर ठाणे, रायगड, अहमदनर कोल्हापूर जिल्ह्यातील गड किल्ल्यांची निवड सदर्न कमांडकडून करण्यात आली आहे. लष्कराच्या सदर्न कमांड अॅडव्हेंचर सेलचे अधिकारी ए. ए. भाटे यांनी ही माहिती दिली. देशाच्या स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षाचा समारोपनिमित्त हा उपक्रम आहे. प्रथमच असा उपक्रम सदर्न कमांडकडून आयोजित केल्याचे त्यांनी सांगितले.