पुणे : कोरोनावर उपचारासाठी अत्यंत उपयुक्त ठरणाऱ्या रेमेडेसिव्हीरचा तुटवडा जाणवू लागल्याने रुग्णांच्या नातेवाईकांमध्ये प्रचंड अस्वस्थता आहे. अनेक ठिकाणी रेमेडेसिव्हीर खरेदी करण्यासाठी लोकांच्या लांब रांगा लागत आहेत. पुण्यात तर रोज हजारोंच्या संख्येने नवे कोरोना रुग्ण आढळत आहेत. त्यांच्यावर उपचार करण्यासाठी रेमेडेसिव्हीरची मोठी गरज भासत आहे. या सर्व गोष्टींचा विचार करुन पुणे जिल्हाधिकाऱ्यांनी महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. त्यांनी रेमेडेसिव्हीर इंजेक्शन वितरणासाठी नियत्रंण कक्ष सुरु केला आहे. रेमेडेसिव्हीर इंजेक्शनचे वितरण सुलभ व्हावे हा यामागचा उद्देश आहे. (Pune district collector passed order to set control room to manage supply of Remdesivir injection)
पुण्यात कोरोना रुग्णांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. येथे रोज हजारो नवे कोरोना रुग्ण आढळत आहेत. रुग्णांची संख्या जास्त असल्यामुळे येथे आरोग्य यंत्रणेवर ताण पडतोय. तसेच येथे औषधांचासुद्धा तुटवडा जाणवतोय. रेमेडेसिव्हीरसारख्या इंजेक्शनचा काळा बाजार जोमता सुरु असल्याच्या काही घटना समोर आल्या आहेत. रेमेडेसिव्हीर इंजेक्शनचा साठा करुन ठेवणे, नंतर ते अवैधरित्या चढ्या भावाने विकणे असे प्रकार येथे अनेक ठिकाणी घडत आहेत. ही गंभीर परिस्थिती घेऊन पुण्यातील जिल्हाधिकाऱ्यांनी नियंत्रण कक्ष स्थापन करण्याचे आदेश दिले आहेत. यामध्ये ज्यांना रेमेडेसिव्हीर इंजेक्शनची गरज असेल त्यांना फक्त एका कॉलवर ते उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. 020-26123371 किवा 1077 टोल फ्री नंबरवर कॉल केल्यांनतर रेमेडेसिव्हीर इंजेक्शन मिळणार आहे. हे नियंत्रण कक्ष आगामी 31 मे पर्यंत सुरु राहील.
Maharashtra: Pune District Collector has passed an order to set up a control room to manage the supply of Remdesivir injection in the district. People in need of Remdesivir injection can call on 020-26123371 or toll-free number 1077. The control room to remain active till 31 May
— ANI (@ANI) April 11, 2021
दरम्यान, देशात कोरोनाची दुसरी लाट आली आहे. मागील अनेक दिवसांपासून देशात कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढतेय. या पार्श्वभूमीवर देशातील आरोग्य यंत्रणेवर प्रचंड ताण वाढला असून दुसरीकडे रुग्ण वाढत असल्यामुळे औषधांचा तुटवडासुद्धा जाणवतो आहे. कोरोनावरील उपचारासाठी उपयुक्त ठरणाऱ्या रेमेडेसिव्हीर इंजेक्शनचा तर मोठा तुटवडा भासू लागलाय. औषधांची अशीच वाणवा राहिली तर आगामी काही दिवसांत परिस्थिती गंभीर होणार असल्याचे सांगितले जात आहे. या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने देशात तयार होणाऱ्या रेमेडेसिव्हीर इंजेक्शनच्या निर्यातीवर बंदी घातली आहे. जोपर्यंत देशातील कोरोनाचा संसर्ग आटोक्यात येत नाही तोपर्यंत इंजेक्शन देशाबाहेर न पाठवण्याचे केंद्र सरकाने रेमेडेसिव्हीर तयार करणाऱ्या कंपन्यांना निर्देश दिले आहेत.
इतर बातम्या :
Remdesivir Injection | भारत सरकारनं रेमेडेसिव्हीरची निर्यात थांबवली, मोदी सरकारचा मोठा निर्णय
(Pune district collector passed order to set control room to manage supply of Remdesivir injection)