सुनिल थिगळे, आंबेगाव, पुणे : पुणे शहरातील एमपीएससी परीक्षा उत्तीर्ण दर्शना पवार हिच्या हत्येमुळे खळबळ उडाली आहे. तिचा हत्येचे प्रकरण मागील आठवड्यात उजडेत आले होते. त्यानंतर पुणे जिल्ह्यात धक्कादायक घटना घडली आहे. प्रियकराला भेटण्यासाठी गेलेल्या महिलेवर सामुहिक अत्याचार झाला आहे. त्या महिलेला जीवे मारण्याची धमकी देत तिच्यावर अत्याचार करण्यात आले. या प्रकरणी पोलिसांनी चार जणांवर गुन्हा दाखल केला आहे.
सामुहिक बलात्काराच्या घटनेने पुणे जिल्ह्यातील आंबेगाव तालुका हादरला आहे. एका २२ वर्षीय विवाहित महिलेला जीवे मारण्याची धमकी देत चार जणांनी तिच्यावर अत्याचार केला आहे. प्रियकराला भेटण्यासाठी ती महिला गेली होती. त्यावेळी प्रियकराच्या मित्रांकडून सामुहिक अत्याचार झाला आहे. त्या महिलेला डोंगराळ भागातील जंगलात निर्जनस्थळी नेऊन चौघांनी तिच्यावर अत्याचार केला आहे. या प्रकरणी पिडित महिलेच्या तक्रारीवरुन घोडेगाव पोलीसांत चार नराधमांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार ही घटना २३ जून रोजी घडली. पीडित २२ वर्षीय महिला विवाहिता आहे. तिचे एकावर प्रेम होते. २३ जून रोजी सकाळी साडेनऊ वाजेच्या सुमारास ती तिच्या प्रियकराला भेटण्यासाठी जात होती. यावेळी तिच्या प्रियकराच्या मित्रांनी तिला पाहिले. या चार मित्रांनी तिचा पाठलाग केला. त्यानंतर जीवे मारण्याची धमकी देत बलात्कार केला. तसेच या प्रकारासंदर्भात कुणालाही सांगितल्यास तुला जीवे मारू, अशी धमकी दिली. महिलेने दिलेल्या तक्रारीवरुन संदेश जाधव, संजय, आदेश जाधव आणि चंद्रकांत भालेराव या चौघांवर गुन्हा दाखल झाला आहे. या प्रकरणी एक जणाला अटक करण्यात घोडेगाव पोलिसांना यश आले आहे. तीन जणांचा शोध सुरू आहे.