Pune Crime | पुणे जिल्ह्यात दोन गटात तुफान हाणामारी, एकाचा खून तर…

| Updated on: Sep 30, 2023 | 2:16 PM

Pune Crime | पुणे शहरात गणेश विसर्जन मिरवणुकी दरम्यान दोन गटात तुंबळ हाणामारी झाली होती. या घटनेत महिला आणि मुलेही जखमी झाल्याची घटना ताजी असताना पुणे जिल्ह्यांत दोन गटातील वाद समोर आला आहे. यात एकाचा मृत्यू झाला.

Pune Crime | पुणे जिल्ह्यात दोन गटात तुफान हाणामारी, एकाचा खून तर...
Image Credit source: tv9 Marathi
Follow us on

पुणे | 30 सप्टेंबर 2023 : पुणे शहर आणि जिल्ह्यात गेली दहा दिवस शांतता होती. गणरायाचे विसर्जन होत असताना दोन गुंड टोळ्यांमधील वाद समोर आला. या घटनेत तुफान हाणामारी झाली. त्यात महिला आणि मुलेही जखमी झाल्याची घटना विसर्जनाच्या दिवशी घडली. त्यानंतर शुक्रवारी सिंहगड रोडवर निवृत्त पोलीस कर्मचाऱ्यांचा मुलाचा खून झाला. या घटनांमुळे पुण्यात खळबळ माजली असताना पुणे जिल्ह्यात तुफान हाणामारीचा प्रकार समोर आला आहे. या हाणामारीत एकाचा खून झाला आहे.

कुठे घडला प्रकार

पुणे जिल्ह्यातील पुरंदर तालुक्यात रावडेवाडी येथे दोन गटात तुफान वाद झाला. या वादात एकाचा खून झाला. तीन जण गंभीर जखमी झाले आहेत. सचिन दिलीप रावडे (वय 32) असे मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे. या घटनेत राजेंद्र रावडे, तानाजी निवृत्ती रावडे आणि ओमकार रावडे हे तिघे जखमी झाले आहे. त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले आहे. त्यांची प्रकृती चिंताजनक आहे. डॉक्टर अतिदक्षता विभागात त्यांच्यावर उपचार करत आहे.

पोलिसांनी केली आरोपीला अटक

पोलिसांनी या प्रकरणात तिघांना अटक केली आहे. तसेच इतर आरोपींचा शोध घेण्यासाठी पथक तयार करण्यात आले असून आरोपींच्या शोधासाठी ते रवाना झाले आहेत. तसेच या प्रकरणात अटक केलेल्या आरोपींकडून माहिती घेतली जात आहे. गावात सध्या तणावपूर्ण शांतता आहे. परिस्थिती नियंत्रणाखाली असल्याचे सासवड पोलिसांनी सांगितले.

हे सुद्धा वाचा

काय आहे कारण हाणामारीचे

पुरंदर तालुक्यात रावडेवाडी येथे दोन गटात वाद कशामुळे झाला? याचे कारण अजून समोर आलेले नाही. पोलिसांनी या घटनेचा तपास सुरू केला आहे. उपविभागीय पोलिस अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली सासवड पोलिसांनी तपास सुरु करण्यात आला आहे.